AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malegaon | गिरणा नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान, आठ ते दहा शेतकऱ्यांची जमीन पिकांसह वाहून गेली!

पुराच्या पाण्यात पिक आणि जमीनही शेतकऱ्यांची वाहून गेलीयं. चिंचावड येथील दत्तात्रेय खैरनार यांच्या सह आठ दहा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. ठेकेदाराकडून बंधाऱ्याचे काम वेळेत पुर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बाजूने मातीचा भराव व संरक्षक भिंत न बांधल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Malegaon | गिरणा नदीला आलेल्या पुराने शेतीचे मोठे नुकसान, आठ ते दहा शेतकऱ्यांची जमीन पिकांसह वाहून गेली!
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 9:41 AM
Share

मालेगाव : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील चिंचावड येथे जोरदार पाऊस सुरूयं. गिरणा नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गिरणा नदीवरील आघार व चिंचावड शिवारातील सिद्धेश्वर बंधारा (Siddheshwar Bandhara) लगतच्या आठ दहा शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर जमीन पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांसह जमिन वाहून गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. यंदा पाऊस (Rain) चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पेरणी देखील करून घेतली होती.

पुराच्या पाण्यात पिक आणि जमीनही वाहून गेली

पुराच्या पाण्यात पिक आणि जमीनही शेतकऱ्यांची वाहून गेलीयं. चिंचावड येथील दत्तात्रेय खैरनार यांच्या सह आठ दहा शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. ठेकेदाराकडून बंधाऱ्याचे काम वेळेत पुर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बाजूने मातीचा भराव व संरक्षक भिंत न बांधल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसुल विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

एक ते दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती

पुराच्या पाण्यात दोन्ही बाजूंनी किमान दहा ते पंधरा एकर जमीन पीकासह वाहून गेली. सुमारे एक ते दीड कोटी रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी अगोदरच पेरणी करून घेतली होती. तसेच पिकही चांगले आले होते. मात्र, या मुसळधार पावसाने आणि पुरामुळे चिंचावड येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Follow Us
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा...
वर्षा गायकवाड आणि धांगेकरांसह अनेकांना मारहाण? पोलिसांवर नेत्यांचा गंभीर आरोप
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय घडलं?
तिसऱ्यांदा इंडिया आघाडीतील नेत्यांची धरपकड; दिल्लीत नेमकं काय काय घडलं?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
India Alliance Morcha: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा; आतापर्यंत काय-काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : ज्ञानेश कुमारांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल, पुढे म्हणाले....
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसचा पराभव...
सुधांशू त्रिवेदींचा राहुल गांधींना जोरदार पलटवार; काँग्रेसच्या पराभवांचा इतिहास सांगत उपस्थित केला सवाल!
एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार...
Mumbai : एकीकडे विद्यार्थ्यांची धरपकड तर, दुसरीकडे लोकशाही वाचवा चा एल्गार; मुंबईत राजकीय वातावरण तापलं
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
India Alliance Morcha : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची दिल्ली पोलिसांसोबत चर्चा सुरु
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; राहुल गांधींसह....
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत रणकंदन; इंडिया आघाडीचा मोर्चा अन् राहुल गांधींसह अनेक खासदार ताब्यात
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिस...
इंडिया आघाडीतचं तीव्र आंदोलन! राहुल गांधी, प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं