पंकजा मुंडेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर (Pankaja Munde Gopinath gad speech) बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला.

पंकजा मुंडेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

बीड : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर (Pankaja Munde Gopinath gad speech) बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश मेहता, महादेव जानकर, सुरेश धस, पाशा पटेल, बबनराव लोणकर, अतुल सावे, हरीभाऊ राठोड, सूरजीतसिंह राठोड, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री आणि भापज नेत्या पंकजा मुंडेंनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या भाषणातील अनेक मुद्यांनी (Pankaja Munde Gopinath gad speech) आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर निर्णय घ्यावा.
 • गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून वज्रमूठ आणि मशाल घेऊन महाराष्ट्रभर दौरा करणार, 26 जानेवारीला ‘सुखदा’मध्ये कार्यालय सुरु करणार.
 • मी कुठेही जाऊन काहीही होऊ शकले असते, पण मला ते शोभणारं नाही.
 • जर पदाच्या हव्यासावरुन आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते.
 • कोणी म्हणाले की पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधानपरिषदेचं विरोधीपक्षनेते पद मिळवण्यासाठी दबाव, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही.
 • तुम्ही मला वाघीण म्हटलं की विरोधकांच्या पोटात दुखतं, आता तरी मी आमदारही उरले नाही.
 • सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी 27 जानेवारीला औरंगाबादेत एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार.
 • अजित पवारांच्या शपथविधीनंतर सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले, घर तुटण्याची भीती त्यांच्या डोळ्यात होती.
 • नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल.
 • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यानंतरही एक-एक आमदार जोडण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते, आणि तुम्ही म्हणता मी बंड करणार, कोणाविरोधात? माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत.
 • देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेतल्याचं मला एकाही सूत्राने सांगितलं नाही, डोळे चोळत उठल्यावर कळलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI