Rajesh Kshirsagar : ठाकरे कुटुंबीय कायम मनात, पण राजकीय गुरु एकनाथ शिंदेच, मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच क्षीरसागरांचे मोठे वक्तव्य

| Updated on: Aug 05, 2022 | 2:55 PM

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिली जात असल्याचा आरोप सातत्याने शिंदे सरकारवर होत आहे. मात्र, दिलेली मंजूरी बरोबर आहे की नाही याबाबत तपासणी होण्यासाठी स्थगिती दिल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. केवळ शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेले नाही तर सर्वच कामांबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात 10 मंजूर झाले असतील तर आता लागल्यास 50 कोटींची पूर्तता करु अशी ग्वाहीही क्षीरसागरांनी दिली आहे.

Rajesh Kshirsagar : ठाकरे कुटुंबीय कायम मनात, पण राजकीय गुरु एकनाथ शिंदेच, मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच क्षीरसागरांचे मोठे वक्तव्य
राजेश क्षीरसागर
Follow us on

कोल्हापूर :  (Eknath Shinde) शिंदे सरकार स्थापन होऊन महिना उलटला आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी विभागनिहाय दौरेही केले आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असतानाच (Rajesh Kshirsagar) राजेश क्षीरसागर यांनी मोठे विधान केले आहे. 36 वर्षापासून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत काम केले होते. माझ्यासारखा एकनिष्ठ कार्यकर्ताही सोडून जातो म्हणल्यावर विचार होणे गरजेचे होते. पण तसे झाले नाही. ठाकरे कुटुंबाशी भावनिक नातं हे कायम राहील पण राजकीय गुरु मात्र, एकनाथ शिंदेच असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा (Kolhapur) कोल्हापूर दौरा लवकरच होणार असल्याचे म्हणले आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, भावनिक नातं कायम राहणार असल्यांचेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये राजेश क्षीरसागर यांची एक भर पडली आहे.

कामांच्या तपासणीसाठी तात्पुरती स्थगिती

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिली जात असल्याचा आरोप सातत्याने शिंदे सरकारवर होत आहे. मात्र, दिलेली मंजूरी बरोबर आहे की नाही याबाबत तपासणी होण्यासाठी स्थगिती दिल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. केवळ शाहू महाराजांच्या समाधी स्थळाच्या कामाला स्थगिती दिलेले नाही तर सर्वच कामांबाबत असा निर्णय घेण्यात आला आहे. आघाडी सरकारच्या काळात 10 मंजूर झाले असतील तर आता लागल्यास 50 कोटींची पूर्तता करु अशी ग्वाहीही क्षीरसागरांनी दिली आहे. त्यामुळे केवळ शाहू महाराजच नाही तर सर्वच महापुरुषांच्या कामाची पूर्तता केली जाणार आहे. विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण कोल्हापुरकर हे हुशार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

पक्षाकडून विचार होणे गरजेचे होते

एका मागून एक पक्षाला सोडून शिंदे गटात प्रवशे करीत आहे. त्या दरम्यानच्या काळात याबाबत गांभिर्याने विचार होणे गरजेचे होते. सगल 36 वर्ष काम करुन देखील माझ्यासारखा कार्यकर्ता हा ठाकरे कुटुंबाला सोडून जातो यामागे नेमके कारण काय याचा शोध घेणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही, त्यामुळेची ही वेळ आल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले आहे. आपल्या राजकीय कार्यकीर्दमध्ये ठाकरे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत पण राजकीय गुरु मात्र एकनाथ शिंदेच असल्याचे क्षीरसागर म्हणाले आहेत.

‘ना भूतो ना भविष्यति’ असे होणार शिंदेंचे स्वागत

राज्यात विभागनिहाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे होत आहेत. कोल्हापुरातही 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान त्यांचा दौरा होणार आहे. जनतेने त्यांना स्विकारले तर आहेच पण कडवट शिवसैनिकही त्यांच्याबरोबरच आहे. त्यामुळे कोल्हापुरात त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. केवळ स्वागतच नाहीतर रखडलेली कामे मार्गी लावण्याबाबतही बैठक होणार आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला आहे.