ठाण्यात शिवसेना मनसेचे बाजूबाजूला होर्डिंग्स, सोशल मीडियानंतर आता पोस्टर वॉर

| Updated on: Aug 10, 2020 | 5:11 PM

अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू (Thane MNS And Shiv Sena Poster war) झाले.

ठाण्यात शिवसेना मनसेचे बाजूबाजूला होर्डिंग्स, सोशल मीडियानंतर आता पोस्टर वॉर
Follow us on

ठाणे : ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झाले. अविनाश जाधव यांची सुटका होताच ठाण्यातील राजकारण तापले. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियानंतर आता आपला मोर्चा पोस्टर वॉरकडे वळवला आहे. त्यामुळे शहरात सेना आणि मनसेचे आरोप प्रत्यारोपाचे पोस्टर झळकू लागले आहे. त्यामुळे सध्या ठाण्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.  (Thane MNS And Shiv Sena Poster war)

गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनसैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यानंतर शिवसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्याआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टीकेला उत्तरं देऊन पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे, असे म्हटले होते.

सेना मनसे या दोन्ही पक्षातील वाद अद्याप मिटलेला नाही, हे तीन हात नाका येथे लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवरून दिसून येत आहे. सेना – मनसे यांनी एकमेकांच्या बाजूला लावलेले होर्डिंग्स ठाणेकरांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे भविष्यात हा वाद चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

“आम्ही कधीही एकेरी शब्दात कोणावरही टीका केली नाही. शिवसेनेचे कार्य काय ते आम्ही दाखवून दिले आहे,” असे शिवसेनेचे म्हणणं आहे. तर दुसरीकडे सेनेने काय काम केले हे त्यांना पोस्टर मार्फत दाखवण्याची वेळ आली असून आमच्यावर टीका केली, तर आम्ही देखील सहन करून घेणार नसल्याचे मत मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी मांडले. त्यामुळे सेना आणि मनसेच्या या पोस्टरबाजीमुळे भविष्यात वाद शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसत आहे. (Thane MNS And Shiv Sena Poster war)

संबंधित बातम्या : 

कुणालाही सोडणार नाही, पितळ उघडं पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही : अविनाश जाधव

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन