Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन

Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन

अविनाश जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे. 

अनिश बेंद्रे

|

Aug 07, 2020 | 3:06 PM

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर झाला आहे. नर्सेस आंदोलन प्रकरणी ठाण्याच्या कापुरबावडी पोलिसांनी जाधव यांना अटक केली होती. (MNS Thane District President Avinash Jadhav gets bail)

वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांना आधी तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज सोमवारी फेटाळण्यात आला होता, मात्र ठाणे सत्र न्यायालयाने सात दिवसानंतर जामीन मंजूर केला आहे.

अविनाश जाधव यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याचे मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी सांगितले. “न्यायालयावर आमचा विश्वास आहे, अविनाश जाधव यांच्यावर राजकीय गुन्हे असून लोकशाहीच्या मार्गाने त्यांनी कोविडसाठी आंदोलन केले होते. त्यामुळे जनतेसाठी ही लढाई होती. पुढेदेखील अशीच लढाई जनेतेसाठी सुरू राहील” असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

ठाणे पोलिसांनी कोर्टाकडून अधिक वेळ मागितला होता. तर अविनाश जाधव यांच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद न्यायाधीश पी पी जाधव यांनी ऐकून घेतले आणि त्यांना जामीन मंजूर केला. अविनाश जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे.

हेही वाचा : तडीपारीची नोटीस, कोर्टात नेताना मनसैनिकांचा अविनाश जाधवांवर फुलांचा वर्षाव

ठाणे न्यायालयाने अविनाश जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावली होती. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी मनसे महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत असताना गेल्या शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. (MNS Thane District President Avinash Jadhav gets bail)

अविनाश जाधवांना सोमवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा कोर्ट परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मनसैनिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला होता.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

MNS Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

अविनाश, आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, मनसेचा आक्रमक पवित्रा

(MNS Thane District President Avinash Jadhav gets bail)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें