अ‍ॅक्सिस बँकेतील सरकारी खाती तातडीने वळवा, ठाणे महापौरांचा आदेश

अ‍ॅक्सिस बँकेतील ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची खाती तातडीने सरकारी बँकेत वळवण्याचा मोठा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे.

Thane Municipal corporation decision, अ‍ॅक्सिस बँकेतील सरकारी खाती तातडीने वळवा, ठाणे महापौरांचा आदेश

 ठाणे : अ‍ॅक्सिस बँकेतील ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची खाती तातडीने सरकारी बँकेत वळवण्याचा मोठा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे (Axis Bank Salary Accounts). ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या. एलबीटी, टॅक्स खाती, कर्मचाऱ्यांचे पगार खाती सध्या अ‍ॅक्सिस बँकेत आहेत, त्यांना सरकारी बँकेत तातडीने वळवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर ठाकरे कुटुंबियांवर केलेल्या टीकेनंतर त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत (Thane Municipal corporation decision).

अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना हा वाद आता टोकाला पोहोचला आहे. याचा फटका आता अ‍ॅक्सिस बँकेला (Axis Bank Salary Accounts) बसतो आहे. खाजगी क्षेत्रातील देशात ‘टॉप 5’मध्ये असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेत महाराष्ट्रातील अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन खाती आहेत. मात्र, कुठल्याही खाजगी बँकेत महापालिकेचे पैसे गुंतवण्याऐवजी सरकारी बँकेत ते पैसे गुंतवा अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी केल्या. त्यामुळे आता ठाणे महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्य़ा कर्मचाऱ्यांची खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र पोलीस विभागाची वेतन खाती अ‍ॅक्सिस बँकेतून हलवणार?

यापूर्वी महाराष्ट्र पोलीस विभागाची वेतन खाती अ‍ॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत, अशी माहिती होती. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाईल. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.

सत्तापालटानंतर महाविकास आघाडी सरकारकडून ही खाती पुन्हा स्टेट बँकेसारख्या एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवण्याच्या हालचालींना जोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसारखा मोठा ग्राहक ‘अ‍ॅक्सिस’च्या अ‍ॅक्सिसबाहेर जाणार आहे. महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅक्सिसला हस्तांतरणाचा फायदा, एसबीआयला तोटा

या हस्तांतरणाचा फायदा ‘अ‍ॅक्सिस बँके’ला झाला, मात्र स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावा जबलपुरे यांनी केला. तर, मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती अ‍ॅक्सिस बँकेत उघडली गेल्याचा दावा, देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी केला होता. त्यानंतर, फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने त्यावेळी केली होती.

Thane Municipal corporation decision about Axis bank

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *