सत्ता बदलाचे विदर्भाला फटके? नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय मुंबईला हलवलं

सत्ताबदलानंतर नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय आणि त्यात सुरु असेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही मुंबईत हलवण्यात आलं आहे.

सत्ता बदलाचे विदर्भाला फटके? नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय मुंबईला हलवलं
Follow us
| Updated on: Dec 03, 2019 | 1:52 PM

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्याचे फटके विदर्भातील जनतेला बसायला सुरुवात झाली आहे. सत्ताबदलानंतर नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय (CM office shifted to Mumbai) आणि त्यात सुरु असेलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही मुंबईत (CM office shifted to Mumbai)  हलवण्यात आलं आहे. यामुळे आता गडचिरोलीपासून ते बुलडाण्यापर्यंतच्या सर्व रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी मुंबईत जावं लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालय नागपुरात सुरु केलं होतं. इथेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालयंही होतं. पण आता सत्ता बदलली आणि नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयाला टाळं लागलं. हे कार्यालय आता मुंबईत हलवण्यात आलं आहे.

नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कार्यालय पुन्हा सुरु करावं, या मागणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.

नागपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचं कार्यालय, विदर्भात हजारो रुग्णांना हक्काचा आधार होता. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे अर्ज इथेच निकाली काढण्यात येत होते. हजारो रुग्णांना याचा लाभ मिळाला. गेल्या काही वर्षांत  6 हजार 200 च्या जवळपास लोकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत 50 कोटींवर निधीचे वाटप करण्यात आले. आता हे कार्यालय बंद झालं आहे. त्यामुळे लोकांचा आधारच हिरावला गेला आहे. हे कार्यालय पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, असं मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.

हजारो रुग्णांची गरज लक्षात घेता, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं विदर्भवासियांचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.