AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Expansion: शिवसेना-भाजपाच्या 13 मंत्र्यांचा शपथविधी होणार, 12 किंवा 13 तारखेला होण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी द्या, असे अमित शाहा यांनी सांगितल्याची माहिती आहे. काही नावांसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळेच शाहा यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारके साडे चार तास चर्चा सुरु होती असे सांगितले जाते आहे.

Cabinet Expansion: शिवसेना-भाजपाच्या 13 मंत्र्यांचा शपथविधी होणार, 12 किंवा 13 तारखेला होण्याची शक्यता
शिंदे सरकारचा शपथविधी कधी? Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 3:01 PM
Share

नवी दिल्ली – शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde)सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तारातील (cabinet expansion)पहिला टप्पा 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यात 13 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यात भाजपाचे 8 आणि शिंदे गटाचे 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 11 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर, शपथविधी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट झाली. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार याची यादी आणि तारखा यावर बराच खल झाल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारे साडे चार तास याची चर्चा झाली. 16 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यासोबतच राज्यपालांनी विश्वासमत चाचणीचे दिलेले आदेश, विधानसभा अध्यक्षांची निवड, एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदाला विधिमंडळाने दिलेली मान्यता याबाबतही शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सगळ्या प्रकरणांवर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. कालच्या शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबतची चर्चा झाल्याची माहिती आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी द्या, अमित शाहा यांचा सल्ला

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी द्या, असे अमित शाहा यांनी सांगितल्याची माहिती आहे. काही नावांसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळेच शाहा यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारे साडे चार तास चर्चा सुरु होती असे सांगितले जाते आहे. कोणती खाती कुणाकडे जाणार, याबाबतही बराच खल झाली असल्याची माहिती आहे. भाजपाच्या मंत्रिमंडळातही नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळणार की दुसऱ्या कुणाकडे जाणार, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

भाजपाला 27  तर शिंदे गटाला 13-14 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचा गटाला 13 ते 14 मंत्रिमदे मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या वाट्याला 27 मंत्रिपदे येतील अशी माहिती आहे. गृह तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित खाती अर्थ, महसूल ही भाजपाकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, आरोग्य, शेती यासारखी लोकांशी संबंधित खाती ही शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्षही दिल्लीत

11 जुलैच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचे आणि देशाचे लक्ष असेल. मोदी-शाहा यांच्या भेटीसोबतच एकनाथ शिंदे आणि देवेंड् फडणवीस यांच्यासाठीही ही सुनावणी महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्यांनी आज सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचीही भेट घेतली आहे. नव्याने निवडून आलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही दिल्लीत पोहचलेले असून, त्यांनी काल अमित शाहांची भेट घेतली आहे. कायदेशीर प्रक्रिया काय आहे याबाबतही ते तज्ज्ञांशी भेट असल्याची माहिती आहे. विधानसभेने घेतलेल्या निर्णयांना सुप्रीम कोर्टात आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे वक्तव्यही नार्वेकर यांनी केले आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.