लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

मुंबई : लोकसभा निवडणूक चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. महाराष्ट्रात युती-आघाडीसंदर्भात अद्याप कोणताच ठाम निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक आयोजित केली होती. त्यात राज्यातील लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे कोणते संभाव्य उमेदवार असतील, हे […]

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित

मुंबई : लोकसभा निवडणूक चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. महाराष्ट्रात युती-आघाडीसंदर्भात अद्याप कोणताच ठाम निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक आयोजित केली होती. त्यात राज्यातील लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे कोणते संभाव्य उमेदवार असतील, हे निश्चित करण्यात आले.

लोकसभेसाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार

  • कोल्हापूर – धनंजय महाडिक किंवा हसन मुश्रीफ
  • बीड – अमरसिंह पंडित
  • रायगड – सुनील तटकरे
  • परभणी – बाबजानी दुराणी
  • बुलडाणा – डॉ. राजेंद्र शिंगणे
  • जळगाव – अनिल भायदास पाटील
  • अमरावती – राजेंद्र गवई

कोल्हापुरातून मुश्रीफही इच्छुक

कोल्हापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांच्या नावावर बैठकीत चर्चा झाली. मात्र, उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य होईल, अशी भूमिका हसन मुश्रीफ आणि धनंजय महाडिक यांनी बैठकीत मांडली. मात्र, धनंजय महाडिक यांचं नाव निश्चित होईल, असे मानले जात आहे.

कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धनंजय महाडिक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यात हसन मुश्रीफ हे सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या जागेवर अद्याप निर्णय झाला नाही.

रायगडमधून भास्कर जाधवांना धक्का

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. मात्र, तटकरेंच्या नावामुळे भास्कर जाधव यांना धक्का मानला जात आहे. 2014 च्या निवडणुकीतही रायगडमधून सुनील तटकरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांनी मोदीलाटेतही केंद्रीय मंत्री अनंत गितेंना जेरीस आणले होते. अगदी निसटता पराभव सुनील तटकरे यांनी स्वीकारला होता.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत बाबाजानी दुराणी यांना उमेदवारी न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चाताप झाला होता. बाबाजानी दुराणी हे शरद पवारांते निष्ठावांत समर्थक मानले जातात. अखेर परभणी लोकसभा मतदारसंघातून बाबाजानी दुराणी यांचे नाव राष्ट्रवादीने विचारात घेतल्याचे दिसते आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI