AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Municipal Corporation : ठरलं तर मग..! महापालिका निवडणुकांसाठी 2017 चाच फॉर्म्युला, नेमका बदल कशामुळे..?

2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान, शहरातील बुथची संख्या 8 हजार 500 एवढी होती तर यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गत निवडणुकीत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे वाढीव यंत्रणेचा विचारही झालेला नव्हता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेण्याच्या हेतूने सर्वच यंत्रणेवरील ताण वाढला होता.

Mumbai Municipal Corporation : ठरलं तर मग..! महापालिका निवडणुकांसाठी 2017 चाच फॉर्म्युला, नेमका बदल कशामुळे..?
मुंबई महापालिका
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 01, 2022 | 9:33 AM
Share

मुंबई :  (Corona) कोरोनामुळे केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नव्हते तर त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावरही झाला होता. आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर आता यंदाच्या (Municipal Corporation) महापालिका निवडणुका ह्या 2017 च्या फॉर्म्युला ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोनाने डोके वर करताच बुथच्या संख्येसह ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील संख्या वाढवण्यात आली होती. पण आता कोरोनाचे सावट पूर्णपणे कमी झाल्याने (Administrative machinery) प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी कोरोना निर्बंध पाळावे लागणार नाहीत. गतवेळच्या तुलनेत केवळ 500 बुथ अधिक राहणार आहेत तर कर्माचारी मात्र 45 हजार एवढेच राहणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले आहे.

कोरोनामुळे असे ठरले होते सूत्र..!

महापालिका निवडणुकांना आवधी असला तरी मतदान प्रक्रियेचे नियोजन हे तीन महिने आगोदर केले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 2017 च्या निवडणुकीमध्ये 8 हजार 500 वर असलेलेल्या बुथची संख्या थेट 11 हजार 500 गेली होती. तर कर्मचाऱ्यांची संख्या ही 45 हजारांवरुन थेट 70 हजारपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. 20 ते 25 हजारांनी कर्मचारी वाढवावे लागणार होते. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा यंत्रणेमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार केवळ 500 बुथ वाढवण्याची आवश्यकता आहे.

2017 मध्ये अशी होती यंत्रणा

2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान, शहरातील बुथची संख्या 8 हजार 500 एवढी होती तर यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गत निवडणुकीत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे वाढीव यंत्रणेचा विचारही झालेला नव्हता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेण्याच्या हेतूने सर्वच यंत्रणेवरील ताण वाढला होता. त्यानुसार नियोजन सुरु असतानाच आता कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने पालिका प्रशासनाने यंदा होऊ घालत असलेल्या निवडणुका देखील 2017 च्या दरम्यान जशा पार पडल्या होत्या त्याच पध्दतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पहिल्याच दिवशी हरकती अन् सूचनांचा पाऊस

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने 29 जुलै रोजी वाढीव 9 प्रभागासह 236 प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली आहे. या आरक्षणावर पहिल्याच दिवशी म्हणजे 30 जुलै रोजीच 25 हरकती आणि सूचना दाखल कऱण्यात आल्या होत्या तर मंगळवारपर्यंत या सूनचा आणि हरकती दाखल करता येणार आहेत. याकरिता 24 वार्डात 24 ठिकाणे हे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?