TMC election 2022 : ठाण्यात शिंदेच की ठाकरे? वॉर्ड क्रमांक 45 सह यंदाचे आकडे काय सांगतात?

TMC election 2022 : ठाणे तर एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. या गडाला सुरूंग लावणं उद्धव ठाकरेंना शक्य होणार की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

TMC election 2022 : ठाण्यात शिंदेच की ठाकरे? वॉर्ड क्रमांक 45 सह यंदाचे आकडे काय सांगतात?
ठाण्यात शिंदेच की ठाकरे? वॉर्ड क्रमांक 45 सह यंदाचे आकडे काय सांगतात?
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Aug 07, 2022 | 3:55 PM

ठाणे : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांनी (Maharashtra Municipal Corporation Election 2022) वातावरण ढवळून टाकलं आहे.  राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचं बंड उद्धव ठाकरे यांना चांगलं महागात पडलंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला राज्यातलं सरकार तर पडलंच. मात्र आता या बंडामुळे राज्यातल्या मोठ्या महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. या महानगरपालिकांमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका (TMC election 2022), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेसह पुणे व इतर ठिकाणीही त्यांच्या अडचणी वाढल्याचे चित्र या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. कारण ठाणे तर एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. या गडाला सुरूंग लावणं उद्धव ठाकरेंना शक्य होणार की नाही? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

दिघे यांच्यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना एक मुलाखात दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही मी मुलाखत दिल्यास राज्यात भूकंप होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्या नंतर लगेच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची प्रतिक्रिया आली होती. तुम्हाला दिघे साहेबांबाबत एवढं काय माहिती होतं, तर इतकी वर्ष का गप्प बसला होता? सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार अशी टीका दिघे यांच्याकडून करण्यात आली होती. तर दिघे यांनी थेट ठाकरेंना साथ दिली होती. त्यामुळे या ठिकाणी ती एक मोठी जमेची बाजू ठाकरेंसाठी उरली आहे. त्याचाही ठाण्यातल्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

आकडेवारी काय सांगते?

ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 45 मधल्या आकडेवारीवरती एकदा नजर टाकून बघूया. आकडेवारीचे चित्र काय दाखवतं ते… या वार्डमध्ये एकूण लोकसंख्या ही 35 हजार 654 आहे. यात अनुसूचित जातीचे 2907 मतदार आहेत. तर अनुसूचित जमातीचे असा 417 मतदार आहेत. त्यामुळे जातीय समीकरण हे सर्वच राजकीय पक्षांना सोबत घेऊन चालवावं लागणार आहे. अन्यथा त्यांची वाटचाल कठीण ठरण्याची दाट शक्यता आहे.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर

भाजप-शिंदे गट एकत्र, तर राष्ट्रवादी ठाकरेंची सेना एकत्र?

ठाण्यात यंदा भाजप आणि एकनाथ शिदे हे एकत्र निवडणूक लढताना दिसून येतील. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे यंदा राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही नवी समीकरणंही चर्चेत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें