AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला रवाना

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 च्या सुमारास मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातला रवाना झाले आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल […]

अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला रवाना
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 च्या सुमारास मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातला रवाना झाले आहेत.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यानुसार आज दुपारपर्यंत अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. तसेच आज गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांचा गुजरात दौरा कसा असेल?

सकाळी 8 च्या सुमारास उद्धव ठाकरे गुजरातला जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता गांधीनगर येथे उद्धव यांची सभा होईल. ही सभा झाल्यानंतर दुपारी एक वाजता अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ते मुंबईला परततील.

या आधी गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवत होते. परंतु यंदा त्यांचे तिकीट कापत गांधीनगरमधून अमित शाहांना तिकीट देण्यात आले. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.

गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीदरम्यान शिवसेना भाजप युती होईल  का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्रात ‘शिवेसना मोठा भाऊ राहणार’ अशी टिका शिवसेनेने भाजपला वारंवार सांगितले होतं. तर अमित शाह यांनी शिवसेनेला ‘पटक देंगे’ असे म्हटले होते. परंतु या सर्व गोष्टी पडदा टाकत उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती केली आणि लोकसभा -विधानसभा निवडणुकांना एकत्र लढण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, गुजरातमध्ये अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वत: शहा यांनी उद्धव यांना आमंत्रण दिले  होते. उद्धव यांनी ही हे आमंत्रण स्विकारले आहे. यानिमित्ताने पुन्हा उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजप युतीतली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली