रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये 'गुप्त' हातांची मदत?

एकनाथ खडसेंचा पत्ता कट झाला आहेच, पण त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंचाही (Rohini Eknath Khadse) मार्ग खडतर दिसून येतोय.

रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी मुक्ताईनगरमध्ये 'गुप्त' हातांची मदत?

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Eknath Khadse) यांना भाजपने मुक्ताईनगरमधून उमेदवारी दिली. एखाद्या उमेदवाराला तिकीट जाहीर झाल्यानंतर सहसा जल्लोष पाहायला मिळतो. मात्र एकनाथ खडसेंचा पत्ता कट केल्यामुळे मुक्ताईनगरमध्ये कोणताही जल्लोष पाहायला मिळाला नाही. एकनाथ खडसेंचा पत्ता कट झाला आहेच, पण त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंचाही (Rohini Eknath Khadse) मार्ग खडतर दिसून येतोय.

रोहिणी खडसेंना तिकीट मिळूनही जल्लोषापेक्षा मतदारसंघात जोरदार शांतताच पाहायला मिळते. यातच येत्या दोन दिवस रोहिणी खडसे कोणत्याही ठिकाणी प्रचाराला बाहेर जाणार नाहीत अशीही माहिती आहे. त्यामुळे खडसेंच्या या राजकीय बळीचा दुखवटा मुक्ताईनगरमध्ये पाळला जातोय असंच म्हणावं लागेल. मात्र काय झालं यापेक्षा पक्षाच्या आदेशाचे आम्ही पाईक आहोत, असं सांगत रोहिणी खडसेंनी कामाला सुरूवात केल्याचं सांगितलं.

ज्यांच्यामुळे सर्व काही मिळालं त्यांचाच राजकीय बळी घेण्यासाठी पक्षाने दिलेली विधानसभेची ऑफर रोहिणी खडसे यांनी स्वीकारली. मात्र रोहिणी खडसे यांच्या आमदारकीचा मार्ग म्हणावा तितकासा सोपा नाही. कारण, स्वपक्षाने तिकीट कापल्यानंतर आधीच अडचणीत असणाऱ्या खडसेंना आता युतीतल्या मित्रपक्षानेही धोका दिलाय.

रोहिणी खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे गेल्यावेळी खडसेंच्या विरोधात लढताना चंद्रकांत पाटील यांचा अगदी निसटत्या फरकाने पराभव झाला होता.

स्वतः खडसे निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने चंद्रकांत पाटील रोहिणी खडसेंना चांगली टक्कर देऊ शकतात ही चर्चा जळगावच्या राजकीय गटात सुरू आहे. एवढंच नाही, तर भाजपमधील आणि शिवसेनेतील खडसेंच्या विरोधात असणारे अनेक गुप्त हात चंद्रकांत पाटील यांना मदत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *