AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या?, शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस : तृप्ती देसाई

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे.

नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर हरवल्या?, शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे बक्षीस : तृप्ती देसाई
Trupti Desai
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 15, 2021 | 12:46 PM
Share

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे.  त्यानंतर विविध राजकीय घडामोडींनी गेले दोन ते तीन दिवस गाजले. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता सामाजिक क्षेत्रातूनही मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. या दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर निशाणा साधला आहे (Trupti Desai Criticized Mahavikas aaghadi leaders Nilam Gorhe, Supriya Sule and Yashomati Thakur).

नीलमताई गोऱ्हे, सुप्रियाताई सुळे, यशोमतीताई ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे. ही माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर टीका केली आहे.

‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’ ही भूमिका सोडा!

‘हाथरस बलात्कार प्रकरणात या तिघीही खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळवा म्हणून पुढे सरसावल्या होत्या. परंतु दुर्दैव असे आहे की, आपल्या राज्यात जर एखादी महिला या प्रकरणी आत्ता मंत्रीमंडळात असलेल्या एखाद्या मंत्र्याविरोधात आवाज उठवत आहे. आपल्यावर अत्याचार झाला आहे, असे जर ती सांगत आहे, पोलीसात तक्रार करत आहे, त्याचे पुरावेही देत आहे. तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत.’

‘तरी तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या ‘महाविकास आघाडी सरकार’च्या (Mahavikas aaghadi) मंत्रीमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे” अशी भूमिका तुम्ही या प्रकरणात घेत आहात असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका जर तुमच्यासारख्या महिला नेत्या घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला आहे’, असे तृप्ती देसाई (Trupti Desai) म्हणाल्या.

Headline | 12 PM | धनंजय मुंडेंच्या मेव्हण्यांकडून रेणू शर्माविरोधात तक्रार

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा!

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे, जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून, तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

(Trupti Desai Criticized Mahavikas aaghadi leaders Nilam Gorhe, Supriya Sule and Yashomati Thakur)

हेही वाचा :

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...