AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ना फूट? ना पहाट? सत्तानाट्याला फूलस्टॉप?

अजित पवारांच्या खुलाशानंतर सध्या तरी ना फूट पडलीय, आणि ना ही पुन्हा सत्तेची पहाट उगवण्याची चिन्हं आहेत. मात्र या संभाव्य चर्चांना शिंदे गटातली मतभिन्नता समोर आली. या चर्चेमुळे ठाकरे गटाच्या राऊतांनीही वेगवेगळी मतं वर्तवली.

VIDEO | Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | ना फूट? ना पहाट? सत्तानाट्याला फूलस्टॉप?
Image Credit source: tv9
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 18, 2023 | 11:25 PM
Share

मुंबई : ना फूट पडणार आणि ना ही पुन्हा पहाट उगवणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या खुलाशानं हे स्पष्ट झालंय. पण अजितदादांचा वकूबच असाय, की जरी काही काळ त्यांचा फोन बंद झाला, तरी सत्ताकारणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरु लागतात. काही सुपातले जात्यात जातात. तर काही जात्यातले सुपात येतात. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनीच शहाजी बापू पाटील नॉट रिचेबल झाले. गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रियेस नकार दिला आणि प्रत्येक घडामोडीवरुन पवारांवर टीका करणाऱ्या सदावर्तेंनी इतक्या मोठ्या घडामोडीवर राजकीय प्रतिक्रियेस नम्रपणे नो कॉमेंट म्हटलं.

यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या चर्चांनी शिंदे गटातली चलबिचल प्रकर्षानं समोर आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी जवळपास सत्तेच्या नव्या लग्नाच्या मुहूर्ताचं भाकीत केलं. राष्ट्रवादी सत्तेत परतल्यास आनंदराव अडसूळांनी स्वबळाचा इशारा दिला. अजित पवार युतीसोबत आल्यास शंभुराज देसाईंनी स्वागताची तयारी ठेवली. संजय शिरसाटांनी आधी अजित पवारांसोबत सत्तेत बसणार नसल्याची भूमिका मांडली. नंतर जर अजित पवार भाजपात आले तर स्वागत करु असं म्हणाले. संजय गायकवाड यांनी अजित पवारांचं स्वागत आहे, पण मुख्यमंत्री शिंदेच राहणार असं सांगितलं. तर विजय शिवतारेंनी अजितदादांनाच शिंदे गटात येण्याची ऑफर दिली.

वारं बदललं की मतं बदलतात, याची प्रचिती मागच्या 3 दिवसात जवळपास प्रत्येक पक्षांच्या भूमिकांमधून दिसली. याआधीच्या भूमिका विसरुन अजित पवारांच्या नव्या मार्गात आता काट्यांऐवजी फुलंच आहेत, असं गुलाबराव अप्रत्यक्षपणे म्हणत होते. आग्या मोहोळवरुन उडालेल्या ठिणग्या विसरत संजय गायकवाड अजित पवारांच्या स्वागतासाठी तयार झाले.

संजय गायकवाडांनी आधी राष्ट्रवादी सोबत सत्तेत बसण्यास नकार दिला. नंतर राष्ट्रवादी भाजपला बाहेरुन पाठिंबा देण्याचा अंदाज वर्तवला आणि त्यानंतर अजित पवारांनी भाजपत प्रवेश करावा. मात्र राष्ट्रवादीचा गट आम्हाला मान्य नसल्याची भूमिका घेतली. शिवतारे-अजित पवारांमधलं गाजलेलं चँलेज सर्वश्रूत आहे. पण टीकेची सर्व जळमटं विसरुन शिवतारेंनी पवारांना चक्क ऑफरच दिली. हेच इतर नेत्यांबाबतही घडलं.

स्वतः ‘सामना’तून अप्रत्यक्षपणे अजित पवारांचा गट फुटण्याकडे बोट दाखवणाऱ्या संजय राऊतांचीही भाषा बदललीय. आधी त्यांनीच सामनातून फुटीच्या संकेताची बातमी छापली आणि आता चुकीच्या बातम्यांमुळे मविआवर परिणाम होणार नसल्याचंही राऊतच म्हणतायत. मविआ एकजूट म्हणणारे नाना पटोले फोनवर नेमकं कुणाविषयी बोलत होते? हा संभ्रमही कायम आहे.

आडनावाप्रमाणे पक्षाची अगदी बावनकशी भूमिका मांडणाऱ्या बावनकुळेंनीही चर्चेतल्या बातम्यांमुळे अटींसह स्वागताची प्रतिक्रिया द्यावी लागली. पण या चर्चेत अद्याप दोन नेत्यांच्या स्पष्टपणे प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. जेव्हा शिंदेंनी बंड केलं, तेव्हा फडणवीस जवळपास 10 दिवस माध्यमांसमोर आले नव्हते. यावेळीही अजित पवारांच्या संभाव्य चर्चांवर फडणवीसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप