AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार…थलापती विजयकडे देशाचे लक्ष!

तामिळनाडू राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. येथे एआयएडीएमके पक्षाच्या आमदारांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पक्षाची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तामिळनाडूत मोठी खळबळ, बड्या पक्षाचे थेट दोन तुकडे? तब्बल 30 आमदार...थलापती विजयकडे देशाचे लक्ष!
actor vijay and tamil nadu government formationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 06, 2026 | 12:50 PM
Share

Tamilnadu TVK Government Formation : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता असलेला आणि राजकारणात उतरलेल्या थलापती विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. या पक्षाला एकूण 108 जागा मिळाल्या आहेत. तामिळनाडूत सत्ता स्थापन करायची असेल तर 118 जागा जिंकणे गरजेचे आहे. म्हणजेच टीव्हीके या पक्षाला एकूण दहा जागा कमी पडत असल्याने आता काँग्रेस तसेच सीपीआय, सीपीआयएम या पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर येत आहे. थलापती विजयमुळे एका मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक मोठा पक्षाची थेट दोन शकलं होणार असल्याचे म्हटले जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आता ऑल इंडिया अन्न द्रमुख मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमके या पक्षातील नवनिर्वाचित आमदारांत सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही आमदारांना सत्तेत सामील झाले पाहिजे असे वाटत आहे. तर काही आमदारांच्या गटाला विरोधी बाकावरच बसायला हवे, असे वाटत आहे. त्यामुळे या पक्षात उघड उघड दोन गट पडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार AIADMK पक्षं एकूण 47 आमदारांपैकी 30 पेक्षा जास्त आमदार पक्षातून बाहेर पडून थलापती विजयला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या 30 आमदारांच्या गटाचे सीव्ही षणमुगम हे नेतृत्त्व करत आहेत. लवकरच AIADMK पक्षाचे आमदार षणमुगम यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

आमदारांची नियोजित बैठक टळली

आज (6 मे) AIADMK पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु ऐनवेळी 30 पेक्षा जास्त आमदारांचा सत्तेत सामील होण्याकडे कल असल्याने ही बैठक ऐनवळी पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळेही AIADMK पक्षाचे दोन तुकडे होतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, टीव्हीके पक्षाला पाच जागा जिंकणारी काँग्रेस तसेच डावे पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा