AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी, थलापती विजयची मोठी ऑफर!

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. हा पक्ष आता काँग्रेस आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. त्याआधी या आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी, थलापती विजयची मोठी ऑफर!
thalapathy vijay and rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2026 | 10:11 PM
Share

Tamil Nadu Elections And Government Formation : तामिळनाडूमध्ये अभिनेता असलेल्या आणि आता राजकारणात सक्रिय झालेल्या थलापती विजय याने इतिहास घडवला आहे. विजयच्या टीव्हीके या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरून चक्क 108 जागा जिंकल्या आहेत. टीव्हीके पक्ष तेथील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु बहुमताचा आकडा न गाठता आल्याने आता तेथे आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. विजयचा टीव्हीके हा पक्ष अन्य पक्षांना घेऊन सरकारची स्थापना करणार असून या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपदही दिले जाणार आहे. तामिळनाडूतील सत्तावाटपाचे संभाव्य सूत्र समोर आले आहे.

तामिळनाडूमध्ये कोणाला किती जागा?

तामिळनाडूमध्ये टीव्हीके हा पक्ष सर्वात मोठा ठारला आहे. या पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर डीएमके हा पक्ष असून त्याला 59 जागा मिळाल्या आहेत. एआयडीएमके या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसलाही येथे पाच जागा मिळाल्या आहेत. पीएमके पक्षाला चार तर आययूएमएल या पक्षाला दोन, सीपीआय पक्षाला दोन जागा, सीपीएम पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत.

सत्तावाटपाचा फॉर्म्यूला काय?

सध्याचे आकडे लक्षात घेता सीपीआय, सीपीआयएम, काँग्रेस, व्हीसीके या पक्षांनी पाठिंबा दिल्यास टीव्हीकेचे सरकार स्थापन होऊ शकते. टीव्हीके हा पक्षदेखील या पक्षांनाच सोबत घेऊन सरकारची स्थापना करण्याची शक्यता आहे. टीव्हीके आणि या पक्षांमध्ये अनौपचारिकरित्या चर्चादेखील सुरू झाल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टीव्हीके पक्ष काँग्रेसला दोन मंत्रिपदं, व्हीसीके पक्ष तसेच डाव्या पक्षांना प्रत्येकी एक-एक मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. टीव्हीके हा पक्ष आपल्या मित्रपक्षांना एकूण चार ते सहा मंत्रिपदं देऊ शकतो. टीव्हीके या पक्षात बरेच नेते हे पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्यामुळे या टीव्हीकेला मंत्रिमंडळात काही अनुभवी नेत्यांची गरज आहे. त्यामुळेही टीव्हीके हा पक्ष अन्य पक्षातील काही अनुभवी आमदारांना मंत्रिपद देऊ शकतो.

दरम्यान, टीव्हीके पक्षाकडून थलापती विजय हेच मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी थलापती विजय एका आठवड्याची मुदत मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होणार, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती