AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे… सत्तेच्या चाव्या या पक्षांच्या हातात

Vijay Thalapathy : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांच्या पार्टीने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी विजय यांना 10 जागांची गरज आहे, त्यामुळे कोणता पक्ष किंगमेकर ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तामिळनाडूत घडामोडींना वेग, कोण बनणार मुख्यमंत्री? विजय नव्हे... सत्तेच्या चाव्या या पक्षांच्या हातात
Vijay thalapathyImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 05, 2026 | 5:22 PM
Share

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या राज्याची सत्ता सुमारे साठ वर्षांनंतर डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या हातातून बाहेर पडून तिसऱ्या पक्षाकडे गेली आहे. यावेळी तमिळनाडूत फक्त सत्तांतर झाले नसून अभिनेता ते नेता बनलेले थलापती विजय यांच्या राजकीय उदयाने तामिळ राजकारणाला नवीन चेहरा मिळाला आहे. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाली असून, त्यामुळे ते मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

2026 च्या विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या 234 जागांपैकी विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या आहेत. डीएमके आघाडीला 73 तर एआयएडीएमके आघाडीला 53 जागा मिळाल्या. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी बहुमताच्या आकड्यापासून ते 10 जागांनी दूर आहेत. त्यामुळे आता कोणता पक्ष किंगमेकर ठरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता विजय सत्तेसाठी कोणाचा आधार घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

किंगमेकर कोण?

सर्वात मोठा पक्ष म्हणून टीव्हीकेला राज्यपालांकडून सरकार स्थापनेसाठी आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतर सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना 10 आमदार आणावे लागणार आहेत. सध्या विजय यांची काँग्रेससह इतर छोट्या पक्षांसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू आहे. टीव्हीके काँग्रेस, डावे पक्ष आणि इतर लहान पक्षांसोबत मिळून सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहे. यात विदुथलाई चिरुथैगल काची (VCK), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPIM) आणि इंडियन मुस्लिम लीग यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करू शकतात. जर असे झाले तर हे पक्ष किंगमेकर ठरू शकतात.

आकड्यांचा खेळ काय?

तामिळनाडूत सरकार स्थापन करण्यासाठी ज्या पक्षांच्या पाठिंब्याची शक्यता आहे, ते पक्ष सध्या डीएमकेसोबत आहेत. यात काँग्रेस (5 जागा), CPI, CPIM आणि VCK (प्रत्येकी 2 जागा) यांचा समावेश आहे. टीव्हीकेसाठी आणखी एक पर्याय म्हणजे पट्टाली मक्कल काची (PMK) चा पाठिंबा घेणे. या पक्षाकडे 5 जागा आहेत. तर विजय हे एआयएडीएमकेसोबत आघाडी करण्याची शक्यता कमी आहे. कारण भाजप आणि एआयएडीएमकेची युती आहे. त्यामुळे आता काँग्रेस तामिळनाडूत गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी