सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? फडणवीसांच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर

| Updated on: Nov 28, 2020 | 8:42 PM

सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी उत्तर दिलं आहे.

सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? फडणवीसांच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर
Uday Samant
Follow us on

सिंधुदुर्ग : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी आघाडी सरकारच्या वर्षपुर्तीनंतर सरकारवर टीका करताना या सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी उत्तर दिलं आहे. गेल्या एक वर्षात कोव्हीडचे 8 महिने असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र (Maharashtra) किती चांगल्याप्रकारे सांभाळला याची दखल आंतरराष्ट्रीय हेल्थनेसुद्धा घेतली. दिल्लीच्या टीमनेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं. इतर मुख्यमंत्र्यांनीही असं काम केलं पाहिजे असं कौतूक केल्याचं सामंतांनी म्हटलं आहे. (uday samant responds to devendra Fadnavis criticism in Sindhudurg)

इतकंच नाही तर ‘ज्या संघटनांकडून प्रशस्थिपत्र मिळायचं आहे. त्यांच्याकडून ते मिळालेलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज आम्हाला वाटत नाही. टीका करणाऱ्यांनी त्याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे’ असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला आता देशद्रोही ठरवणार आहात का? या फडणवीस यांच्या प्रश्नालादेखील उदय सामंत यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे. ‘कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्वच आदर करतो. आमच्या पक्षाने या अगोदरच आपली भुमिका स्पष्ट केली. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. मग पुन्हा-पुन्हा त्या विषयाची चर्चा करणं आणि तो पेटवणं यात काय अर्थ आहे’ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तर जे हा विषय सारखा काढत आहे त्यानाच त्यांचं कारण विचारलं पाहिजे अशीही टीका उदय सामंत यांनी फडणवीसांवर केली. (uday samant responds to devendra Fadnavis criticism in sindhudurg)

ते पुढे म्हणाले की, ‘अशा पत्रकार परीषदेतून टीका करून आघाडी सरकारमधील कुठलाही पक्ष चलबिचल होणार नाही. सगळेजण पूर्ण ताकदीनीशी पाचवर्ष पूर्ण करून यांना सत्तेपासून दुर ठेवतील’ अशी टीकादेखील उदय सामंतांनी केली आहे.

इतर बातम्या –

देवेंद्र फडणवीसांची ‘कुडल्यां’ची भाषा धमकी नव्हती काय? मुख्यमंत्र्यांवरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

ठाकरे सरकारने ‘चुल्लू भर पानी में डूब मरना चाहिए’, देवेंद्र फडणवीसांची टोकाची टीका

(uday samant responds to devendra Fadnavis criticism in sindhudurg)