AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uday Samant : आम्हीच खरी शिवसेना, दुसरा शिंदे गट स्थापन केला नाही, उदय सामंत यांची स्पष्टोक्ती

उदय सामंत म्हणाले, विनायक राऊत यांनी केलेली टीका ही खिलाडू वृत्तीने घेतली. कार्यालय सोडणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. चांगल्या कार्यालय शुभ कार्यालय त्यांनी सोडू नये

Uday Samant : आम्हीच खरी शिवसेना, दुसरा शिंदे गट स्थापन केला नाही, उदय सामंत यांची स्पष्टोक्ती
उदय सामंत यांची स्पष्टोक्ती
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 2:56 PM
Share

रत्नागिरी : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाचे उदय सामंत म्हणाले, आम्ही शिवसेनाच आहोत. आम्ही शिंदे नावाचा दुसरा गट स्थापन केला नाही. गट स्थापन करून दुसरीकडे कुठे आम्ही जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार घेवून पुढे जातोय. मातोश्री शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हायजॅक करावा, अशी कुठलीही आमची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उदय सामंत म्हणाले, न्यायालयीन लढा आम्ही लढत आहोत. शिंदे यांच्यासोबत कायदेशीर लढाईत आम्ही आहोत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका करणे आपल्या राजकारणात बसत नाही. दर पाच वर्षानी आम्ही निवडणुका लढत आलोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील आमदार हा भगवा घेतलेला आणि खासदारसुद्धा शिवसेनेचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंनी दौरा करायचा की नाही हा त्यांचा अधिकार

विरोधक राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिंदे यांच्याबाबत अपप्रचार करत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आणि बहुमतावेळी युतीचे आकडे वाढत गेलेत. एकनाथ शिंदे यांना धोका होता. त्या अनुषंघाने तत्कालीन गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी बैठक पण घेतली होती. त्यानंतर हा प्रसंग घडलाय. तो प्रसंग शंभुराजे यांनी सांगितला आहे. यात अजून काय घडलं हे शंभूराजे देसाई सांगू शकतील. उद्धव ठाकरे यांनी दौरा करायचा की, नाही करायचा हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही शिवसेनेत आम्ही गद्दार नाही. हीच भूमिका आम्ही सर्वोच्च न्यायलायात मांडलीय. शिवसेना आणि भाजपचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. तर शिवसेना-भाजपचे उपमुख्यमंत्री हे आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत.

विनायक राऊतांची टीका खिलाडू वृत्तीने घेतली पाहिजे

उदय सामंत म्हणाले, विनायक राऊत यांनी केलेली टीका ही खिलाडू वृत्तीने घेतली. कार्यालय सोडणे हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. चांगल्या कार्यालय शुभ कार्यालय त्यांनी सोडू नये. रामदास कदम यांच्या संपर्कात कोकणातून कोण याची चर्चा केली. रामदास कदम यांनी घेतलेली भूमिका मोठी आहे. संभाजीनगर पासून ते दौरा सुरु करणार आहेत. बाळासाहेबांचा विचारा पक्का करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सर्व सामान्यांचा शाखा प्रमुख मुख्यमंत्री झाला याचा अभिमान आहे. मंत्रीमंडळ विस्तार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसा लवकरच विस्तार होईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.