साताऱ्यात दोन दिग्गजांची गळाभेट, उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीने चर्चा

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे (Udayanraje Bhosale and Shashikant Shinde meet) या दोघांची एक वेगळी ओळख आहे.

साताऱ्यात दोन दिग्गजांची गळाभेट, उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीने चर्चा

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे (Udayanraje Bhosale and Shashikant Shinde meet) या दोघांची एक वेगळी ओळख आहे. दोघेही पहिल्यापासून एकमेकांचे जीवलग मित्र होते. मात्र उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर, दोघांनी एकमेकांना  धारेवर धरले. या नादात दोघांचाही पराभव झाला. (Udayanraje Bhosale and Shashikant Shinde meet)

उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत तर शशिकांत शिंदे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. हा  पराभव दोघांच्याही जिव्हारी लागणारा होता.

निवडणुकीच्या धामधुमीनंतर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच एका लग्नसोहळ्यात भेट झाली. निवडणुकीच्या दीड महिन्यानंतर, शेंद्रे येथे एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दोघेही समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील ही दुश्मनी एका मिठीत सामावून गेली.

ही गळाभेट जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणात नवीन कलाटणी मिळवू शकते का याची चर्चा सध्या साताऱ्यात होऊ लागली आहे.


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI