माझं राज्य दुष्काळात, अंगावर गुलाल घेणार नाही : उदयनराजे

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, विजयाने हुरळून न जाता, उदयनराजे भोसलेंनी खऱ्या अर्थाने ‘जनतेचे राजे’ असल्याचं दाखवून दिलं. विजयानंतर गुलाल उधळून, वाजत-गाजत जल्लोष साजरा करण्याला उदयनराजेंनी विरोध केला आणि म्हणाले, “माझं […]

माझं राज्य दुष्काळात, अंगावर गुलाल घेणार नाही : उदयनराजे
Follow us
| Updated on: May 24, 2019 | 9:41 AM

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, विजयाने हुरळून न जाता, उदयनराजे भोसलेंनी खऱ्या अर्थाने ‘जनतेचे राजे’ असल्याचं दाखवून दिलं. विजयानंतर गुलाल उधळून, वाजत-गाजत जल्लोष साजरा करण्याला उदयनराजेंनी विरोध केला आणि म्हणाले, “माझं राज्य दुष्काळात, मी विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही.”

काय म्हणाले उदयनराजे?

“साताऱ्ययात खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. या विजयानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विजयाचं श्रेय सर्व सातारकरांना देतो. मात्र, विजयाचा जल्लोष साजरा करणार नाही. कारण माझं राज्य दुष्काळात आहे. महाराष्ट्रात प्रचंड  दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे गुलाल उधळून जल्लोष करणार नाही.” असे उदयनराजे म्हणाले.

सध्या राज्यात दुष्काळपरिस्थीती आहे. अनेकजन दुष्काळात होरपळतायत. दुष्काळावर मी थोड्या दिवसातच काम करणार आहे, असे आश्वासन उदयनराजे भोसलेंनी दिलं. तसेच, दुष्काळी परिस्थितीमुळे मी विजयाची मिरवणूक काढणार नाही. मी हार गुच्छ स्वीकारणार नाही, मी गुलाल लावून घेणार नाही, असेही उदयनराजेंनी जाहीर केले.

“माझ्या कामात काही चुका होत असतात, त्या मला लोकांनी दाखवून द्याव्यात, त्या मी चुका वेळीच सुधारेन.” असे उदयनराजेंनी जनतेला आवाहन केले.

तसेच, विजयानंतर उदयनराजे काहीशे भावूक झाले आणि जुन्या आठणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “माझ्या कमी वयात मी जावलीचा आमदार झालो असतो. सर्वात कमी वयाचा मी आमदार झालो असतो. परंतु घरगुती शब्दामुळे म्हणजे आमच्या आजी सुमित्राराजे यांच्या शब्दामुळे मी निवडणूक लढवली नव्हती.”

मतदारसंघभाजप/शिवसेनाकाँग्रेस/ राष्ट्रवादीवंचित बहुजन आघाडीविजयी उमेदवार
नंदुरबारहिना गावित (भाजप) के. सी. पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे (VBA)हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) सुभाष भामरे
जळगावउन्मेष पाटील (भाजप)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)उन्मेष पाटील (भाजप)
रावेररक्षा खडसे (भाजप) उल्हास पाटील (काँग्रेस)नितीन कांडेलकर (VBA)रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)बळीराम सिरस्कार (VBA)प्रतापराव जाधव (शिवसेना) आघाडी
अकोलासंजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)प्रकाश आंबेडकरसंजय धोत्रे (भाजप)
अमरावतीआनंदराव अडसूळ (शिवसेना)नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे (VBA)नवनीत कौर राणा
वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)धनराज वंजारी (VBA) रामदास तडस (भाजप)
रामटेककृपाल तुमाणे (शिवसेना)किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे-पाटनकर (VBA)कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूरनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजप)नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)एन. के. नान्हे (VBA)सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजप) नामदेव उसेंडी (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे (VBA)अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजप) सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिमभावना गवळी (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)प्रो. प्रवीण पवार (VBA)भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)सुभाष वानखेडे (काँग्रेस)मोहन राठोड (VBA) हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेडप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस) प्रा. यशपाल भिंगे (VBA)प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)राजेश विटेकर (राष्ट्रवादी)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)संजय जाधव (शिवसेना)
जालनारावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)सुभाष झांबड (काँग्रेस)इम्तियाज जलील (VBA)इम्तियाज जलील (VBA)
दिंडोरीडॉ. भारती पवार (भाजप)धनराज महाले (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे (VBA)डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पवन पवार (VBA)हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडीसुरेश अर्जुन पाडवी (VBA)राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडीकपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)डॉ. ए. डी. सावंत (VBA)कपिल पाटील (भाजप)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आनंद परांजपे (राष्ट्रवादी)मल्लिकार्जुन पुजारी (VBA)राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)संजय निरुपम (काँग्रेस)गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)संभाजी शिवाजी काशीद (VBA)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस) पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. संजय भोसले (VBA)राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (शिवसेना)मिलिंद देवरा (काँग्रेस)डॉ. अनिल कुमार (VBA)अरविंद सावंत (शिवसेना)
रायगडअनंत गीते (शिवसेना)सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)सुमन कोळी (VBA) सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)पार्थ पवार (राष्ट्रवादी)राजाराम पाटील (VBA)श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजप)मोहन जोशी (काँग्रेस)अनिल जाधव (VBA)गिरीश बापट (भाजप)
बारामतीकांचन कुल (भाजप)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर (VBA)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगरसुजय विखे (भाजप)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)सुधाकर आव्हाड (VBA)सुजय विखे (भाजप)
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे (VBA)सदाशिव लोखंडे (शिवसेना) आघाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) प्रा. विष्णू जाधव (VBA)डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर (VBA)ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूरसुधाकरराव श्रंगारे (भाजप) मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)राम गारकर (VBA)सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)प्रकाश आंबेडकर (VBA)जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)संजय शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे (VBA)रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगलीसंजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)गोपीचंद पडळकर (VBA)संजयकाका पाटील (भाजप)
सातारानरेंद्र पाटील (शिवसेना)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)सहदेव एवळे (VBA)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)मारुती रामचंद्र जोशी (VBA)विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) डॉ. अरुणा माळी (VBA)संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)राजू शेट्टी (स्वाभिमानी)अस्लम बादशाहजी सय्यद (VBA)धैर्यशील माने (शिवसेना)
Non Stop LIVE Update
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.