Uddhav Aurangabad Sabha : तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे, संदीप देशपांडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, रावसाहेब दानवेंचाही हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केलीय.

Uddhav Aurangabad Sabha : तोफ धडाडणार म्हणे, लवंगी वाजली तरी पुरे, संदीप देशपांडेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, रावसाहेब दानवेंचाही हल्लाबोल
शिवसेनेवर भाजप आणि मनसेची टीका
| Updated on: Jun 08, 2022 | 10:19 AM

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thcakeray) यांची आज औरंगाबादमध्ये (aurangabad) सभा आहे. ही सभा विराट होणार असल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे या सभेपूर्वी अनेक घडामोडींना वेग आलाय. एकीकडे शिवसेनेचे माजी नगरसेवक (Shivsena Corporator) चेतन कांबळे यांच्या जाहिरातीची (Advertisement) औरंगाबादेत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीतून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेविरोधात भाजपची शहरात बॅनरबाजी सुरू असल्याचं दिसतंय. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई सध्या औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी रंगली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

‘…लवंगी वाजली तरी पुरे’

मनसे नेते शिवसेनेवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंची सभा असो वा राज्य सरकारचा कारभार, यावर शिवसेना नेते आणि खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे टीका करताना दिसून येतात. यातच आता आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर देखील मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला खोचट टोलाही लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेवर भाजपची टीका

शिवसेना आणि भाजप यांच्यातील द्वंद सर्वश्रृत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडता नाही. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करण्यात आलीय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘सभेला गर्दी व्हावी, यासाठी औरंगाबाद शहराला 227 कोटी रुपये दिले. पूर्वी राजे लोक गर्दी करण्यासाठी रस्त्याने पैसे उधळायचे. तशी अवस्था शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची झाली आहे.’ अशी टीका रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

आजच्या सभेकडे विशेष लक्ष

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्री कुणावर टीका करणार? राज ठाकरेंना काय उत्तर देणार? औरंगाबादच्या नामांतरावर मुख्यमंत्री काही बोलणार का? भाजपवर आजच्या सभेतून काय टीका करणार? याकडे अवघ्या राज्याच लक्ष लागून आहे. सभेपूर्वी औरंगाबादमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.

 

 

देशपांडेंना आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे मा. बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागे साठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.’

भाजपची सभेवर टीका

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेवरून रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘गर्दी व्हावी यासाठी औरंगाबाद शहराला 227 कोटी रुपये दिले. पूर्वी राजे लोक गर्दी करण्यासाठी रस्त्याने पैसे उधळायचे. तशी अवस्था शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची झाली आहे.’ असा हल्लाबोल भाजपने शिवसेनेवर केला आहे.