AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 जूनला हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता 29 जूनला सरकारच्या हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

29 जूनला हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा, उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश
uddhav thackeray
| Edited By: बापू गायकवाड | Updated on: Jun 27, 2025 | 5:59 PM
Share

शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता 29 जूनला सरकारच्या हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे. हिंदी भाषेला आपला विरोध नाही मात्र सक्तीला विरोध आहे. आम्ही मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही. हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या GR ची होळी करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आज उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी दुपारी 3 वाजता शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्याचे ठाकरे यांनी आवाहन केले, तसेच शालेय शिक्षण विभागाकडून हिंदी सक्तीचा GR काढण्यात आला आहे त्याची होळी करा असं उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना सांगितले.

राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र आंदोलन

राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी हिंदीविरोधी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शरद पवारांचाही विरोध

कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांना राज्यातील हिंदी सक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही, तसेच हिंदीला दुर्लक्षीत करूनही चालणार नाही. पाचवीपासून हिंदी योग्य आहे. पहिली ते चौथीपर्यंत एकदम नवीन भाषा लादणं योग्य नाही.’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?