संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. (Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे?, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

मुंबई : संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. कोरोना संकटातही भाजपनं सरकार पाडण्याचं काम केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडण्याचं काम झाले, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. हा देश म्हणजे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

क्रांतिकारकांनी लाठ्या काठ्या खाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. इंग्रजांच्या साम्राज्यावरचाही सूर्य मावळला. कन्याकुमारी ते काश्मीर देशात सर्वत्र तुम्हाला सत्ता आणायची होती. मात्र, भाजपला आता ते करता येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

हरियाणातील बिष्णोईंसोंबत जो डाव खेळला तोच डाव शिवसेनेविरुद्ध खेळला. तोच डाव बिहार मध्ये होतोय. देशाची विल्हेवाट लागत चालली आहे. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे कसे घालत आहात, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. नितीशकुमारांनी कोणती लस दिली असा सवाल ठाकरेंनी राज्यापालांचे नाव न घेता विचारला.

जीएसटीची पद्धत अपयशी ठरली आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं आणि जीएसटीवर आवाज उठवला पाहिजे. आपला जीएसटीचा पैसा द्यायला केंद्र तयार नाही. कर्ज काढायचा प्रस्ताव दिला गेला त्याला आम्ही विरोध केला आहे.

मी मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख आहे. जीवंत दहशतवादी पकडण्याचं काम मुंबई पोलिसांनी केले. जगात इतर कुठल्याही देशाला जमलं नाही. कोरोनाचे संकट आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या संकटातही फक्त सरकार पाडण्याचे काम होणार असेल तर देशात अराजक माजेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

CM Uddhav Thackeray Speech | हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

(Uddhav Thackeray asked question to bjp on alliance with Nitishkumar )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *