AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाजपेयी यांनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं होतं; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल

महाराष्ट्रातील जनता मला कुटुंब प्रमुख मानतं म्हणून ते मला बदनाम करत आहेत. त्यांना हिंदुहृदयसम्राट कुणी म्हणत नाही त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत आहे. मुंबई महापालिकेचा घोटाळा जरूर काढा. इतर महापालिकेचाही काढा आणि पीएम केअरचाही काढा.

वाजपेयी यांनी तुम्हाला केराच्या टोपलीत टाकलं होतं; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 10, 2023 | 2:38 PM
Share

अमरावती : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. गेल्या आठवड्यात ज्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष सोबत घेतला. तुम्ही घरभेदी आहात. घर फोडे आहेत. आमच्या कुटुंबाची निंदा नालस्ती करता. पण आम्ही तुमच्या कुटुंबावर बोलायचं नाही हे कोणतं हिंदुत्व? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच राणा दाम्पत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केली. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो राहीलच. काही लोक तात्पुरते आहेत. एका चुकीमुळे संसदेत जाऊन बसले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राणा दाम्पत्यांचं नाव न घेता केली.

आम्ही महाराष्ट्र दाखवला

भाजपचे दोन खासदार होते. तुम्हाला कोणी ओळखत नव्हते. या शिवसैनिकांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र दाखवला. आम्ही हे भूत मानेवर बसून फिरवलं होतं. आज तुम्ही आम्हाला संपवत आहात? हे तुमचे हिंदुत्व? आम्ही 25 वर्ष सोबत होतो. तरीही आम्हाला संपवलं? असा सवाल त्यांनी भाजपला केला.

भाजप कार्यकर्त्यांचे कुपोषण

हे सर्व पाहून मला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया येते. भाजपचे कार्यकर्ते कुणाचं ओझं घेऊन जात आहेत? मला भाजपच्या कार्यकर्त्यांचा आदर आहे. त्रिपुरात वगैरे भाजपचे लोकांना तुडवलं जायचं. तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी पक्ष वाढवला. तुमच्या आयुष्याची सतरंज्या झाल्या आहेत. ते सत्तेची हंडी बांधत आहेत. मी पोटतिडकीने भाजप कार्यकर्त्यांबाबत बोलत आहे. भाजप कार्यकर्त्यांचे कुपोषण होत आहे. नको ते लोक ढेकर देत आहेत, अशी तळमळही त्यांनी व्यक्त केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.