‘अरे तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी,…’, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा डिवचलं

"अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावाइतक्या 52 तरी जागा द्या. एवढं जीवंत माणसांचं प्रेम त्याग करुन तुमच्या खोक्यात घुसलेले हे मिंधे आहेत. त्यांना 48 जागांमध्ये आटोपणार?", असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

'अरे तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी,...', उद्धव ठाकरे यांनी पुन्हा डिवचलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:28 PM

मुख्यमंत्री : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या आडनावावरुन टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बावनकुळे आणि भाजपवर सडकून टीका केली.”मी मोठं आव्हान देतोय, भाजपला असं वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे बावन काय 152 कुळं जरी खाली आले तरी ठाकरेंपासून शिवसेना कुणी तोडू शकत नाही. प्रयत्न करुन बघा. मी तर म्हणतो, हिंमत असेल तर तातडीने निवडणुका घ्या. तुम्ही मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो. बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतं”, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“दोन प्रदेशाध्यक्ष, एक माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बरेच दिवस मास्क घालून फिरत होते. प्रदेशाध्य होते तेव्हा काय म्हणाले होते? हे सत्तांतर झालं तेव्हा आम्ही हृदयावर दगड ठेवून हे ओझं अंगावर घेतलं आहे. म्हणजे हे मिंधे अंगावर घेतले आहेत, चंद्रकांत पाटील तेव्हा बोलले आहेत की हृदयावर दगड ठेवून हे स्वीकारलेलं आहे. आताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही मिंधे गटाला फक्त 48 जागा देणार. अहो बावनकुळे साहेब, तुमच्या नावाइतक्या 52 तरी जागा द्या. एवढं जीवंत माणसांचं प्रेम त्याग करुन तुमच्या खोक्यात घुसलेले हे मिंधे आहेत. त्यांना 48 जागांमध्ये आटोपणार?”, असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“एकनाथ शिंदे गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा कर्तृत्व शुन्य आहे. कारण अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं हा तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणात जन्म दिला त्या राजकारणारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्यासमोर फिरणार आहेत”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

हे सुद्धा वाचा

‘दिसला भ्रष्टाचारी की घेतला पक्षात’

“मी लढाई समजू शकतो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई कोण करणार तर भाजप? भाजपने लक्षात ठेवावं, कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत यादी काढली तर हातभर पेक्षा जास्त मोठी होईल, संपूर्णपणे तुम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना पक्षात घेतलेलं आहे. काल-परवा त्यांचाच एक आमदार विधान परिषदेत बोललेला आहे की, आमच्याकडे निरमा पावडर आहे. जे आमच्याकडे भ्रष्ट लोकं येतात त्यांना या निरमा पावडरने धुतलं की ते स्वच्छ होतात. काय मोठ्या मनाची माणसं आहेत बघा. भ्रष्टाचारी शिल्लकच ठेवायचे नाहीत. दिसला भ्रष्टाचारी की घेतला पक्षात. पण सगळी भ्रष्ट माणसं तुमच्या पक्षात घेतल्यानंतर एक काम मात्र नक्की करा. पहिले तुमचं नाव बदला जे भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता भ्रष्ट नाही. भ्रष्ट झालेला पक्ष असं त्याचं नाव ठेवा”, असा सल्ला त्यांनी दिला.

‘कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर’

“भाजपमध्ये जे चांगले माणसं आहेत त्यांना विचारतो की, तुमच्या आजूबाजूला जे भ्रष्टाचारी बसल्यानंतर त्या भ्रष्टाचारांच्या मेळ्यात तुम्ही सभ्य माणसं कसे जाऊ शकतात. पण दुसऱ्याच्या कुटुंबावर बेफान आरोप करतात. चारित्र्य हनन करतात. कुणाच्याही मुलावर आरोप कर, कुणाच्या पत्नीवर आरोप कर, पण यांच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर भारताचा अपमान. तुमचा नेता म्हणजे भारत नाही. एवढा शुद्र माझा भारत नाहीय. मोदींवर टीका केल्यानंतर भारताचा अपमान. मोदी म्हणजे भारत मान्य आहे का? यांच्यासाठी आपल्या क्रांतीकारकांनी रक्त सांडलं होतं? माझा देश मोठा आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘…तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील’

“तुमच्या कुटुंबियांवर बोलल्यानंतर ताबडतोबीने पोलीस कारवाई करतात. घराघरात पोलीस घुसतात. माणूस परराज्यात गेला असेल तर तिकडून पकडून आणता. तुमचं कुटुंब जसं तुम्हाला प्यारं आहे तसं प्रत्येकाचं कुटुंब आपापल्याला प्यारं आहे. आमच्या कुटुंबियांचा बदनामीचा प्रकार तुम्ही थांबवला नाही तर तुमच्या सुद्धा कुटुंबियांचे लागेबांधे आम्हाला काढावे लागतील”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. “आतासु्द्धा आम्ही काढत नाहीत. कारण आमचं हिंदुत्व. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही तुमच्या घरामध्ये महिला, मुलं असतील. पण कुणी कुटुंब व्यवस्था मानत नसेल तर प्रश्नच संपला”, अशी टीका त्यांनी केली.

“दुसऱ्याच्या कुटुंबावर आरोप करायचे, घरी धाडी टाकायच्या. हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? शिवसेना काँग्रससोबत गेली म्हणून हिंदुत्व सोडलं. वाटतं तुम्हाला? एक तरी अशी घटना दाखवा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्वापासून लांब गेलो. आम्ही हिंदुत्व म्हणजे मर्यादा पाळतोय हे आमचं हिंदुत्व आहे. राष्ट्रीयत्व हे आमचं हिंदुत्व आहे. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. माझे वडील, आजोबा जे सांगत आहेत तेच मी बोलतोय”, असं ठाकरे म्हणाले.

‘लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर, बेशुद्ध पडेपर्यंत तिची चौकशी’

“तुम्ही कुणाच्याही घरामध्ये पोलीस घुसवत आहात. अनिल देशमुख यांना आत टाकलं होतं. अनिल देशमुख यांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. पाच-सहा वर्षाची चिमुकली. तिची चौकशी केली. लालू प्रसाद यादव यांची सून गरोदर आहे. ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केली. एवढं निर्घृण आणि विकृत हिंदुत्व असू शकत नाही. हे आमचं हिंदुत्व नाहीय. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की, परस्त्री मातेसमान आहे. पण तुम्ही घरात घुसताय. महिला गर्भवती असली तरी तिला चौकशीसाठी ताटकळत ठेवत आहात. ती बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत आहात. सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करत आहात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.