AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील’, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला मिश्किल टोला

"आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray slams Modi Government).

'...नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील', उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला मिश्किल टोला
| Updated on: Dec 13, 2020 | 7:50 PM
Share

मुंबई : “आपला शेतकरी शेतात मरमर मरुन सोनं पिकवतो. सोनं म्हणजे अन्न, नाहीतर त्याच्या घरावरही धाडी पडतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी सोनं पिकवतात. त्यामुळे जातील आणि शेतकऱ्यांच्या घरावर धाडी टाकतील. शेतकरी अन्नधान्य पिकवतो. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हक्क हिरावून बाहेरुन कांदा, साखर आणत आहे. हा कुठला कारभार आहे?”, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला (Uddhav Thackeray slams Modi Government).

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहव मंत्री अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते.

“दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावं. जर शोध लागत असेल तर त्यांची फेरयंत्रणा फार प्रभावी मानावी लागेल. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray slams Modi Government).

“न्याय हक्कासाठी रस्त्यावर अन्नदाता येत असेल, तर त्याच्याशी नीट जावून बोलण्याऐवजी त्याला देशद्रोही, अतिरेकी, चिनी, पाकिस्तानी म्हणायचे. पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तानमधून शेतकरीदेखील आणायला लागले. आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानचं सर्टिफिकेट द्यायचं? असाच जर कारभार चालणार असेल तर हा तुघलकी कारभार सहन करणार नाही”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

“जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावं लागतंय. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचं लक्षण नाही. जर याची व्याख्याच त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भाजपचं मागील वर्ष सरकार कधी पडतंय आणि कधी पडणार याचे मुहुर्त काढत बसण्यात गेले आहेत. त्यामुळे सरकारने काय काय कामं केलीत हे त्यांनी पाहिलंच नसेल. सरकारने मागील वर्षभरात काय कामं केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. जनतेत कुठंही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावं लागतं. त्यामुळे ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरतं बरोबर आहे,” असंही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातमी : कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.