AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधमाश्यांच्या पोळ्याला हात घातलाय, आता डंख मारण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे कलानगरातून कडाडले

शिवसैनिकांना बळ देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील.

मधमाश्यांच्या पोळ्याला हात घातलाय, आता डंख मारण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे कलानगरातून कडाडले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 18, 2023 | 3:13 PM
Share

मुंबई : महाशिवरात्रीचा (Mahashivratri) मुहूर्त साधून त्यांनी मधमाशांच्या पोळ्याला दगड मारलाय. आतापर्यंत त्यांनी मधाचा स्वाद घेतलाय आता डंख मारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हजारो शिवसैनिकांना संबोधित केलं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. मुंबईत मातोश्रीबाहेर आज सकाळपासूनच राज्यभरातील शिवसैनिकांची गर्दी जमली होती. शिवसेनेची पुढील रणनीती काय आहे, हे ठरवण्यासाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर कलानगर चौकात ओपन जीपवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

आता डंख मारण्याची वेळ…

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, ‘ धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. निवडणुकीत या लोकांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा महुर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारलं आहे. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिडलेला आहे. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघत कोसळला नसेल.

धनुष्यबाण चोराला दिला…

मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानं सुरू आहेत.मशालही काढतील. माझं आव्हान आहे.

मर्द असाल तर धनुष्यबाण घेऊन या…

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांनी चॅलेंज दिलं. ते म्हणाले, ‘ धनुष्यबाण चोरणारे मर्द असेल तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो…’

चोरांना गाडून छाताडावर उभा राहीन…

शिवसैनिकांना बळ देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभा राहील. उद्या फेसबुक लाइव्ह करेल. निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं होतं. ते मी विस्ताराने सांगितलं. काँग्रेस फुटली त्यामुळे चिन्हं गोठवलं. पण दुसरं चिन्हं दिलं नव्हतं. वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव दिलं नाही. हा इतिहास आहे..

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.