उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात जाणार

उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात जाणार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसतंय. अयोध्या दौऱ्यानंतर ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात जाणार आहेत. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे वाराणसी इथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे अयोध्येनंतर वाराणसी आता भगवीमय होणार आहे.

उद्धव ठाकरे सोमवारी पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रति काशीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यानंतर ते वाराणसी इथे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहेत. वाराणसी हा लोकसभा मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीआधी वाराणसीचा दौरा करणार हे निश्चित आहे.

उद्धव ठाकरे यांनी हा दौरा दसरा मेळाव्यातच जाहीर केला होता. त्यामुळे दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचं शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितलं आहे. वाराणसी दौऱ्याअगोदर उद्धव ठाकरे सोमवारी सकाळी पंढरपुरात सभा आणि महाआरती करणार आहेत.

उद्धव ठाकरेंचा संभावित दौरा – 24 डिसेंबर

पंढरपूर विठ्ठल-रुक्मीणी मंदिर दर्शन

मुंबई ते पंढरपूर ‘विठाई’ एसटी बस सेवा शुभारंभ

पंढरपूर चंद्रभागा किनारी ‘हिंदू महासभा’

सध्याकाळी चंद्रभागा किनारी महाआरती

उद्धव ठाकरेंचं अयोध्येत जंगी स्वागत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. “पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही मंदिर बनवा, मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येईन. आता हिंदू गप्प बसणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Published On - 7:59 pm, Fri, 21 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI