AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर तात्काळ निकाल लागणार, न्यायलयाने केवळ ‘ही’ अट टाकावी; उल्हास बापट यांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला

SC on CM Eknath Shinde Disqualification Case : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही मिनिटात लागणार; त्याआधी उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी कायदेशीर बाबी सांगितल्या...

तर तात्काळ निकाल लागणार, न्यायलयाने केवळ 'ही' अट टाकावी; उल्हास बापट यांनी कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 11, 2023 | 11:40 AM
Share

पुणे : राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. या निकालात सर्वोच्च न्यायलय नेमकं काय म्हणतं. त्यांचा निर्णय काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या निकालाआधी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकलाय. तर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी निकाल उशीरा लागणार असल्याचं म्हटलं आहे.

न्यायलयाने केवळ ‘ही’ अट टाकावी- बापट

घटनेत सर्वोच्च स्थानी जनता आहे. आमदार अपात्र ठरल्यानंतर पुन्हा निवडून येईपर्यंत ते अपात्र असतात. विधानसभा अध्यक्षांकडे हा विषय आला तर त्यांनी त्यावर तात्काळ निर्णय घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने त्यातील पळवाटा बंद कराव्यात. 15 दिवसांत निर्णय द्यावा अशी अट न्यायालयाने घालावी, असं उल्हास बापट म्हणालेत.

भारतीय घटनेचा अर्थ लावण्याचे अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. विधानसभा अध्यक्षांना तो बंधनकारक असेल. अपात्र ठरवल्यानंतर कोणी बहुमत सिद्ध करू शकले. राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते, असंही उल्हास बापट म्हणालेत.

हा खटला इतके दिवस चालू राहणे हेच मुळात चुकीचं आहे. आज निकाल लागत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. 2-3 लोक एकावेळी बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर ते वाचतात. पण 16 जण एकाच वेळी बाहेर पडले पण ते 2-3 होत नाहीत. त्यामुळे ते अपात्र ठरतात, असं उल्हास बापट म्हणालेत.

ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर पक्ष आणि पक्ष चिन्हासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल. स्टेटस्को अँटी आदेश दिल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. अपात्र ठरवल्यानंतर कोणी बहुमत सिद्ध करू शकले नाही तर, असंही बापट म्हणाले आहेत.

असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

सत्ता संघर्षाचा निकाल साधारणता एक वाजता येईल. आधी दिल्लीच्या एका केस निकाली आणि मग आपल्या राज्याच्या निकालाच्या वाचनाला सुरुवात होईल त्यामुळे थोडासा वेळ जाईल. हा निकाल देशाच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा असेल, असं असीम सरोदे म्हणाले आहेत.

पक्षांतर बंदी सारख्या कायद्याला नवं वळण देणारा हा निकाल असू शकतो. हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडेच पाठवलं जाईल. न्यायालय कायद्याच्या अनेक बाजू पाहून हा निकाल देईल आणि अध्यक्षांना देखील न्यायालय काही नियम घालून देईल, असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?