AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Hearing : शिवसेना पक्षफूट आणि कपिल सिब्बल यांचे ते 2 महत्त्वाचे प्रश्न, शिंदे गट कोंडीत? सुनावणीत कोर्टात काय घडलं?

Shivsena Supreme Court Hearing : आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सर्वात अगोदर त्यांनी निवडणूक आयोगाने चुकीच्या आधारावर निर्णय घेतला. जो निर्णय घेतला तो चुकीचाच आहे, असे सांगितले. हा दावा करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आयोगाच्या निकालाची प्रतही सादर केली.

Shivsena Hearing : शिवसेना पक्षफूट आणि कपिल सिब्बल यांचे ते 2 महत्त्वाचे प्रश्न, शिंदे गट कोंडीत? सुनावणीत कोर्टात काय घडलं?
kapil sibal and shiv sena supreme court hearingImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 13, 2026 | 3:03 PM
Share

Shiv Sena Result Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षफुटीबाबत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. शिवसेना पक्षफुटी आणि निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेला निर्णय हा चुकीचा होता, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत. विशेष म्हणजे ठाकरे यांची बाजू मांडता सिब्बल यांनी न्यायालयापुढे अनेक कागदपत्रे जमा केली आहेत. सोबतच अनेक ऐतिहासिक दाखले देऊन भूतकाळातील निर्णय हे शिवसेना पक्षफुटीसाठी कसे लागू होत नाहीत, हे कपिल सिब्बल न्यायालयापुढे मांडत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या (13 ऑगस्ट) सुनावणीत कपिल सिब्बल यांनी दोन महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमुळे शिंदे गटाची अडचण होऊ शकते.

तथ्य तपासून निकाल का दिला नाही? निवडणूक आयोग चुकीचा

आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. सर्वात अगोदर त्यांनी निवडणूक आयोगाने चुकीच्या आधारावर निर्णय घेतला. जो निर्णय घेतला तो चुकीचाच आहे, असे सांगितले. हा दावा करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आयोगाच्या निकालाची प्रतही सादर केली. सिब्बल यांनी उपस्थित केलेले दोन प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाल का दिला नाही? हा प्रश्न उपस्थित होताच आता शिंदे गटाला आपल्या युक्तिवादात या त्याचे समाधानकारक उत्तर द्यावे लागलणार आहे.

कार्यकारिणी 2कोणत्या आधारावर जाहीर केली?

दुसरीकडे ठाकरे गटाची बाजू मांडत असताना पक्षफुटीनंतर शिंदे गटाने घेतलेल्या काही निर्णयांचाही सिब्बल यांनी उल्लेख केला. पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिंदे गटाने आपली नवी कार्यकारिणी जाहीर केली होती. शिंदे गटाने ही कार्यकारिणी कोणत्या आधारावर जाहीर केली? असा दुसरा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. पक्षाला कोणतीही नोटीस दिल्याशिवाय निवडणूक आयोग कोणताही निर्णय घेऊ शकता. आम्हाला कोणतीही नोटीस मिळालेली नव्हते. पक्ष कार्यरत नसेल तर पक्ष रद्द करू शकतो. परंतु संबंधित पक्षच अन्य कोणाला देता येत नाही, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी उपस्थित केला.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार