Nitin Gadkari : केंद्रात भाजपची सत्ता कुणामुळे आली?; मोदी, शाहांऐवजी गडकरींनी दिलं ‘या’ दोन नेत्यांना श्रेय

Nitin Gadkari : मात्र, ज्याला समाज आणि देशाची निर्मिती करायची असते तो पुढच्या शंभर वर्षाचा विचार करत असतो. तो एका शतकातून दुसऱ्या शतकात प्रवास करण्याचा विचार करत असतो. यात कोणताही शॉर्टकर्ट नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.

Nitin Gadkari : केंद्रात भाजपची सत्ता कुणामुळे आली?; मोदी, शाहांऐवजी गडकरींनी दिलं 'या' दोन नेत्यांना श्रेय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 5:53 PM

मुंबई: देशात मोदी लाटेमुळे भाजपची (bjp) सत्ता आल्याचं नेहमी सांगितलं जातं. राजकीय विश्लेषकही भाजपची केंद्रात सत्ता येण्याचं सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनाच देतात. मोदींचं वक्तृत्व आणि अमित शाह यांचं संघटन कौशल्य यामुळेच केंद्रात भाजपचं सरकार आल्याचं सांगितलं जातं. पण भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी मात्र, केंद्रात भाजपचं सरकार येण्याचं श्रेय मोदी आणि शाह यांना दिलेलं नाही. गडकरी यांच्या मते भाजप आज काही पूर्ण क्षमतेने उभा आहे, जो काही सत्तेत आला आहे, त्याचं सर्व श्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जातयं. गडकरी यांनी थेट सत्तेचं श्रेय वाजपेयी आणि अडवाणी यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गडकरी यांना भाजपच्या संसदीय समितीच्या समितीतून वगळण्यात आलं आहे. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी हे विधान केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या कार्यक्रमात संबोधित करताना नितीन गडकरी यांनी हे विधान केलं. यावेळी गडकरी यांनी भाजपच्या 1980च्या संमेलनातील वाजपेयींच्या भाषणाचं स्मरण केलं. वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। त्या संमेलानाला मी उपस्थित होतो. आम्ही वाजपेयींचं भाषण ऐकत होतो. तेव्हा असा एक दिवस येईलच, असं आम्हा सर्वांना वाटत होतं. वाजपेयी, अडवाणी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. त्यामुळे देश आणि देशातील अनेक राज्यात आपण मोदींच्या नेतृत्वात सत्तेत आलो आहोत, असं गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यात कोणताही शॉर्टकर्ट नाही

यावेळी गडकरी यांनी सत्ता केंद्रीत राजकारणावरही भाष्य केलं. हे भाष्य करताना संघाचे विचारक दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांचा हवाला दिला. प्रत्येक राजकारणी पुढच्या निवडणुकीचा विचार करत असतो, असं ठेंगडी म्हणायचे. तो पुढची पाच वर्ष विचार करत असतो. कारण या निवडणुकीनंतर पुढची निवडणूक कधी येणार याचा तो विचार करत असतो. मात्र, ज्याला समाज आणि देशाची निर्मिती करायची असते तो पुढच्या शंभर वर्षाचा विचार करत असतो. तो एका शतकातून दुसऱ्या शतकात प्रवास करण्याचा विचार करत असतो. यात कोणताही शॉर्टकर्ट नाहीये, असंही त्यांनी सांगितलं.

रस्ते अपघातात वर्षाला 1.50 लाख लोकांचा मृत्यू

यावेळी नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातावरही भाष्य केलं. सल्लागारांकडून तयार करण्यात आलेल्या डीपीआरमधील चुकांमुळेच अपघात वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याच कारणामुळे देशात वर्षाला 1.50 लाखाहून अधिक लोक रस्ते अपघाताचे बळी ठरतात, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.