धनंजय मुंडेंचे कर्तृत्व पक्षासाठी मोठं, मला डावलण्याचे कारण पक्षाने सांगावं : प्रकाश सोळंके

मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी पक्षासोबत आहे. पक्ष सांगेल ते काम करेल," असेही प्रकाश सोळंके स्पष्ट केले (Prakashdada Solanke resign) आहे.

धनंजय मुंडेंचे कर्तृत्व पक्षासाठी मोठं, मला डावलण्याचे कारण पक्षाने सांगावं : प्रकाश सोळंके

पुणे : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर राष्ट्रवादीत आता नाराजीनाट्य सुरु झाल्याचे पाहायला मिळत (Prakashdada Solanke resign) आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके आज (31 डिसेंबर) आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. दुपारी 12 पर्यंत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आपला राजीनामा देणार (Prakashdada Solanke resign) आहेत.

राजीनामा देण्यासाठी प्रकाश सोळंके नुकतंच ते पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहे. याची कल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली आहे. मात्र राजीनाम्यापूर्वी त्यांना भेटणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने सोळंके राजीनामा देणार असल्याचे बोललं जात आहे.

“राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे कर्तृत्व जास्त आहे. त्यांचे नेतृत्व पक्षाला मोठं वाटलं असेल,” अशी टीका प्रकाश सोळंके यांनी केली.

“प्रकाश सोळंके यांनी मी व्यक्तीगत राजकीय संन्यास घेतो आहे. मी पक्षाबद्दल नाराज नाही. कंटाळा आल्याने हा निर्णय घेत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि माझ्या राजीनाम्याचा संबंध जोडू नये, असे टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले. तसेच मी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मी पक्षासोबत आहे. पक्ष सांगेल ते काम करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले (Prakashdada Solanke resign) आहे.

“मी पक्षाबद्दल नाराज नाही. राजकारण आणि माझ्या बाबतीत जे काही घडलं. त्याची उदग्निता आली. मात्र मी पक्ष सोडणार नाही. आमदारकीचा राजीनामा देऊन पक्षाचे काम करेन. राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार,” असेही सोळंके यांनी स्पष्ट केलं (Prakashdada Solanke resign) आहे.

“मला राजकारणाचा किळस आला आहे. मला का डावलण्यात आले हे पक्ष सांगेल. पक्षाने हा निर्णय घेतल्याने तो योग्य असेल. मला मात्र राजकारणाचा वीट आल्याने मी हा निर्णय घेतला आहे.” असेही प्रकाश सोळंके म्हणाले.

“याबाबत माझा कोणाशीही संवाद झालेला नाही. जरी झाला असला तरी आता याला काहीच अर्थ नाही. मी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला असून तो पार पाडण्यास मी मुंबईला निघालो आहे. तसेच कोणाकडून मनधरणी व्हावी याची अपेक्षा नाही.” असेही ते म्हणाले.

“मी जो निर्णय घेतला आहे. तो आजच पार पाडणार आहे. मात्र मी पक्ष सोडणार नाही. मी राष्ट्रवादीचा आहे आणि भविष्यातही पक्षासोबतच राहणार असेही त्यांनी स्पष्ट केले.”

“आमदार कशाला, मी कार्यकर्ता म्हणूनही विकास करू शकतो. विकासासाठी पक्ष पाठीमागे राहील. पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि करणार नाही, मी पक्षासोबत आहे, पक्ष सांगेल ते काम करेल असेही ते (Prakashdada Solanke resign) म्हणाले.”

कोण आहेत प्रकाश सोळंके ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके हे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आहे.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या रमेश आडसकर यांचा पराभव केला होता.

माजलगावच्या पंचायत समितीचे सोळंके हे उपसभापती आहेत.

ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *