सोनिया गांधींचे निकालाआधाची विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी एनडीएच्या विरोधात असलेल्या सर्व प्रमुख पक्षांना एकत्र आणून गैरभाजपा सरकार स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. दक्षिण भारतात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्याकडून तिसऱ्या मोर्चाचे प्रयत्न सुरु झाल्यानंतर काँग्रेसनेही आता जमवाजमव […]

सोनिया गांधींचे निकालाआधाची विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी एनडीएच्या विरोधात असलेल्या सर्व प्रमुख पक्षांना एकत्र आणून गैरभाजपा सरकार स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. दक्षिण भारतात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव यांच्याकडून तिसऱ्या मोर्चाचे प्रयत्न सुरु झाल्यानंतर काँग्रेसनेही आता जमवाजमव सुरु केली आहे. सोनिया गांधींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

विरोधी पक्षांचे प्रमुख नेते 22, 23 आणि 24 मे रोजी राजधानी दिल्लीत आहेत की नाही, याबाबतची माहिती सोनिया गांधींनी फोनवरुन घेतली आहे. सर्व पक्ष पंतप्रधान मोदींविरोधात आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी हे पक्ष एकत्र आले नसले तरी निवडणुकीनंतर मोदीविरोध दाखवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वात या सर्व पक्षांची बैठकही होऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व अभियानाची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर देण्यात आली आहे. सर्व पक्षांशी संपर्क साधून त्यांना यूपीएत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्याची जबाबदारी कमलनाथ यांच्यावर असेल. एकीकडे भाजपने पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे काँग्रेसनेही सत्तास्थापनेसाठी निकालाआधीच प्रयत्न सुरु केले आहेत.

कमलनाथ यांना काँग्रेसमध्ये मोठं महत्त्व आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मोदींचा कार्यकाळ अवघा काही दिवसांचाच उरला असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत म्हटलं होतं. मध्य प्रदेशात 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला होता. पण यावेळी मध्य प्रदेशातून काँग्रेसला मोठी अपेक्षा आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.