सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल : उर्मिला मातोंडकर

सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल, असं वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar criticized on CAA) यांनी केले.

Urmila Matondkar criticized on CAA, सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल : उर्मिला मातोंडकर

पुणे : सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल, असं वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar criticized on CAA) यांनी केले. पुण्यात आज (30 जानेवारी) गांधी भवन येथे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, बिशप डाबरे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम (Urmila Matondkar criticized on CAA) पार पडला.

“सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल. सीएए कायदा मुस्लिम विरोधी भासवला जात आहे. तो मुस्लिम विरोधी तर आहे पण गरिबांच्याही विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा आम्हाला मान्य नाही”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

“गांधी आजही विचारानं आपल्यात आहे. त्या विचारावर देश उभा आहे, अहिंसेच्या मार्गानं पुढं जायचं आहे. आजची लढाई आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधींच्या विरोधात आहे. लोकशाही म्हणजे संसद नव्हे तर लोकशाही म्हणजे देशाचे नागरिक असतात आणि नेते सुद्धा नागरिकच असतात”, असंही उर्मिला म्हणाल्या.

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “महात्मा गांधींच्या विचारधारेचा तेव्हाही खून करण्याचा प्रयत्न झाला आणि आताही होत आहे. गांधीजींचे शरीर खाली कोसळले मात्र त्यांचा विचार खाली कोसळला नाही त्यांचे विचार आजही आपल्या मनात आहे.”

“बाहेर घोषणा देणारे लोक आणि त्यांचे नेते गांधी विचारधारेचे असो किंवा नसो. परंतु गांधी जयंती आणि पुण्यतिथी दिवशी राजघाटावर जाऊन त्यांना गांधींजींसमोर नतमस्तक व्हावं लागतं”, असं उर्मिला यांनी सांगितले.

“गांधी यांनी खरा हिंदू धर्म पाळला मात्र त्यांना हिंदूंनी गोळ्या झाडल्या, हिंदू मुस्लिम द्वेषामुळे देश पुढं जाणार नाही.
या व्यतिरिक्त मी इथं काय बोलू”, असा सवाल ही उर्मिला मातोंडकर यांनी केला.

दरम्यान, या कार्यक्रमावेळी पुण्यात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी एनआरसी, सीएए विरोधात आयोजित करण्यात आलेली ही जाहीर सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी 12 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गांधीभवनसमोर त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. देश के गद्दारो को गोली मारो सालो को, वंदे मातरम, जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं. पोलिसांनी साधारण तीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *