‘रंगीला गर्ल’ उर्मिलाची रिक्षा स्वारी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

मुंबई: ‘रंगीला गर्ल’ अर्थातच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने रविवारचा दिवस मुंबईतील रिक्षा चालकांसोबत घालवला. इतकंच नव्हे तर रिक्षा चालकांना आकर्षित करण्यासाठी तिने चक्क रिक्षाही चालवली. सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल […]

रंगीला गर्ल उर्मिलाची रिक्षा स्वारी
Follow us on

मुंबई: ‘रंगीला गर्ल’ अर्थातच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच टेम्पल रन केलेल्या उर्मिलाने रविवारचा दिवस मुंबईतील रिक्षा चालकांसोबत घालवला. इतकंच नव्हे तर रिक्षा चालकांना आकर्षित करण्यासाठी तिने चक्क रिक्षाही चालवली.

सध्या देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. नुकतचं राजकारणात सक्रीय झालेल्या उर्मिलाने मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शक्कल लढवली.

रविवारी सुट्टीच्या दिवसाचे निमित्त साधत उर्मिला अचानक रस्त्यावर उतरली. उर्मिलाने गोराई परिसरातील रिक्षा चालकांसमोर प्रचार केला. त्यानंतर उर्मिलाने स्वत: रिक्षा चालवली. यानंतर संध्याकाळच्या सुमारास उर्मिलाने एका प्रचारसभेचे आयोजन केलं. यात तीने मराठीसह गुजरातीतही भाषण केले.

”अवघ्या 24 तासात कोणत्याही भाषेचे ज्ञान येत नाही. मी मुंबईकर असल्याने मला मराठीसह, हिंदी, गुजराती या भाषेचेही ज्ञान आहे आणि मला थोडंफार गुजराती पहिल्यापासूनच येते. तसेच देशातील अनेक भाषांचे मला ज्ञान असल्याचंही उर्मिलाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.”

उर्मिलाचे टेम्पल रन

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने राजकारणात सक्रीय होत बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर शुक्रवारी उर्मिलाला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच तिने बोरीवलीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर तिने गुरुद्वारामध्ये जाऊनही दर्शन घेतले होते. याआधी या मतदारसंघातून 2004 साली अभिनेता गोविंदा यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याने सलग पाच वेळा खासदार असलेले राम नाईकांचा पराभव केला होता.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध सुरु होता. अखेर काँग्रेसचा हा शोध संपला असून या ठिकाणी उर्मिलाला उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी अशी चुरशीची लढत उत्तर मुंबई मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

पाहा व्हिडीओ :