उर्मिला मातोंडकरचं 'टेम्पल रन', तिकीट जाहीर होताच, मंदिर, गुरुद्वाराला भेट

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तिकीट जाहीर होताच, उर्मिलाने आज सकाळी ‘टेम्पल रन’ केलं. उर्मिलाने बोरीवली परिसरातील मंदिर, गुरुद्वारांना भेटी दिल्या. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने राजकारणात सक्रीय होत बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत उर्मिला काँग्रेसमध्ये दाखल …

उर्मिला मातोंडकरचं 'टेम्पल रन', तिकीट जाहीर होताच, मंदिर, गुरुद्वाराला भेट

मुंबई : अवघ्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तिकीट जाहीर होताच, उर्मिलाने आज सकाळी ‘टेम्पल रन’ केलं. उर्मिलाने बोरीवली परिसरातील मंदिर, गुरुद्वारांना भेटी दिल्या.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने राजकारणात सक्रीय होत बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत उर्मिला काँग्रेसमध्ये दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यानंतर शुक्रवारी उर्मिलाला काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच तिने बोरीवलीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर तिने  गुरुद्वारामध्ये जाऊनही दर्शन घेतले. तसेच गुरुद्वारात जाऊन तिने प्रसाद आणि सरबतही घेतले.

…. म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला : उर्मिला मातोंडकर

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध सुरु होता. अखेर काँग्रेसचा हा शोध संपला असून या ठिकाणी उर्मिलाला उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान या मतदारसंघासाठी भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विरुद्ध गोपाळ शेट्टी अशी चुरशीची लढत उत्तर मुंबई मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *