.... म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला : उर्मिला मातोंडकर

नवी दिल्ली : रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर काँग्रेसमध्ये दाखल झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिलाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या इथे भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार आहेत. त्यांच्याविरोधात उर्मिला रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर …

.... म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला : उर्मिला मातोंडकर

नवी दिल्ली : रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर अखेर काँग्रेसमध्ये दाखल झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उर्मिलाला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या इथे भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार आहेत. त्यांच्याविरोधात उर्मिला रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत.

अभिनेत्री जयाप्रदा यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने राजकारणात सक्रीय होत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज दुपारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्मिला काँग्रेसमध्ये दाखल झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, संजय निरुपम यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

सध्या कलात्मक स्वातंत्र्यावर गदा आली आहे, त्यामुळे मी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी काम करत राहणार आहे, फक्त निवडणुकांपुरते काम न करता, नेहमीच काम करेन, असं यावेळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सांगितलं. तसेच पक्षप्रवेशावेळी राहुल गांधी यांच्याविषयी उर्मिलाने प्रतिक्रिया दिली. सध्याच्या स्थितीत सर्वांना एकत्रित घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. जो सर्वांना न्याय देईल, जो सर्वांना सोबत घेऊन काम करेल, अशा नेत्याची गरज आहे. माझ्या नजरेत राहुल गांधी त्या नेत्याप्रमाणे आहेत, असंही उर्मिलाने नमूद केलं.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसकडून मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष संजय निरुपम मैदानात होते. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी संजय निरुपम यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी यंदा संजय निरुपम यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध सुरु होता. या मतदारसंघासाठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री शिल्पा शिंदे यांनी उमेदवारी मागितल्याची चर्चा होती. पण आता उर्मिलाला या मतदारसंघात तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या –

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूक लढणार? मतदारसंघ आणि पक्ष ठरला?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *