AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईचं मंगळसूत्र गहाण ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात, आतापर्यंत 30 वेळा पराभव

हिंगोली : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांनी मतदानाला सुरुवात होणार आहे.  सगळ्याच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सोलापुरात वार्षिक उत्पन्न 9 रुपये असलेल्या महास्वामीने निवडणुकीत उतरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले असताना, हिंगोलीतही लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने लक्ष वेधले आहे. 30 पेक्षा अधिकवेळा निवडणुकीत उभं राहिलेले उत्तम भागाजी कांबळे सध्या सर्वांच्या चर्चेचे […]

आईचं मंगळसूत्र गहाण ठेऊन निवडणुकीच्या रिंगणात, आतापर्यंत 30 वेळा पराभव
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

हिंगोली : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांनी मतदानाला सुरुवात होणार आहे.  सगळ्याच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. सोलापुरात वार्षिक उत्पन्न 9 रुपये असलेल्या महास्वामीने निवडणुकीत उतरत सर्वांचे लक्ष वेधून घेतले असताना, हिंगोलीतही लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने लक्ष वेधले आहे. 30 पेक्षा अधिकवेळा निवडणुकीत उभं राहिलेले उत्तम भागाजी कांबळे सध्या सर्वांच्या चर्चेचे विषय ठरले आहेत.

हिंगोली लोकसभा मतदार संघातून उत्तम भागाजी कांबळे यांनी आतापर्यंत 30 निवडणुका लढवल्या आहेत. यावेळी ते दोन मतदार संघातून कांबळे निवडणूक लढवत आहेत. कांबळेंनी जमेल ती वस्तू विकून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतांनी हरलेल्या पण हिमंतीने जिंकलेल्या या उमेदवारांचा संघर्ष कायम सुरूच आहे.

आतापर्यंत लढवलेल्या निवडणुका

उत्तम कांबळेंनी आतापर्यंत सहावेळा ग्रामपंचायत, चारवेळा तंटामुक्ती, तीनवेळा पंचायत समिती, एकदा जिल्हा परिषद, सहावेळा विधानसभा, चारवेळा लोकसभा लढवली आहे. सध्या कांबळे हिंगोली लोकसभा आणि वाशिम- यवतमाळ या दोन मतदार संघातून उभे राहिले आहेत.

मंगळसूत्र विकून उमेदवारी अर्ज दाखल

उत्तम कांबळे यांच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र असे असताना सुद्धा आजपर्यंत कांबळे यांनी घरातील अनेक गोष्टी विकून निवडणुकीत उभे राहिले आहे. कांबळेंनी राजकारणाच्या नादात आपलं सर्वस्व पणाला लावलं असून कधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बकर्‍या विकून, तर कधी आईच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोण आहेत उत्तम कांबळे?

उत्तम भागाजी कांबळे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात येणार्‍या शेंबाळपिंपरी गावचे आहेत. जिल्ह्यातले सगळेच लोकप्रतिनिधी कांबळे यांनी नावाने ओळखतात. कांबळेंनी यांचं एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण झालं आहे. गावाच्या, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या समस्या सुटाव्यात म्हणून स्वखर्चातून आंदोलनं, उपोषण, मोर्चे कांबळेंनी काढले आहेत. कांबळेंना आमदार म्हणून लोक आवाज देतात. कांबळे यांच्या आईला सुद्धा त्यांना लोकप्रतिनिधी झाल्याचं बघायचं आहे.

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....