आधी रक्तदान करुन अर्ज भरला, आता एसटीतून प्रवास, वैशाली येडेंचा प्रचार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

यवतमाळ: आपल्या भाषणाने मराठी साहित्य संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी आज एसटी बसमधून प्रवास करत प्रचार केला. वैशाली येडे या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे […]

आधी रक्तदान करुन अर्ज भरला, आता एसटीतून प्रवास, वैशाली येडेंचा प्रचार
Follow us on

यवतमाळ: आपल्या भाषणाने मराठी साहित्य संमेलन गाजविणाऱ्या वैशाली येडे यांनी काही दिवसापूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर त्यांनी आज एसटी बसमधून प्रवास करत प्रचार केला. वैशाली येडे या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली येडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणात वेगळेच वातावरण निर्माण झालं आहे. वैशाली येडे यांचा उमेदवारी अर्ज 25 मार्च रोजी भरण्यात आला. त्यावेळी  प्रहार संघटेनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तादान करुन अनोखा उपक्रम राबवला.

त्यानंतर आज वैशाली येडे यांनी त्यांच्या कळंब तालुक्यातील राजुल गावातून एसटी बसने यवतमाळपर्यंत प्रवास केला. एसटी प्रवासादरम्यान त्यांनी सहप्रवाशांकडे मतरुपी पाठिंबा मागितला. सुमारे 35 किमीचा प्रवास त्यांनी एसटीने केला.

वैशाली येडे आज आपल्या गाववरुन यवतमाळला उमेदवारी अर्ज छाननी आणि चिन्ह वाटपसाठी आल्या होत्या. त्या एकट्या बसने प्रवास करत होत्या.

हल्ली आलिशान मोठ्या गाडीशिवाय कार्यकर्ते सुद्धा प्रचार करत नाहीत. मात्र वैशाली येडे यांनी अशा पद्धतीने केलेला बसप्रवास चर्चेचा विषय बनला आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी प्रहार संघटनेकडून झोळी फिरवून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. आज त्यांच्या या बस प्रवासामुळे त्या आणखी चर्चेत आल्या आहेत.

यवतमाळमधील उमेदवारांची संपत्ती

प्रहार उमेदवार – वैशाली येडे

यांच्याकडे 5 ग्रॅम सोने असून, त्याची किंमत 15 हजार आहे

3.5 एकर शेती आहे

जंगम मालमत्ता: 1 लाख 18 हजार 500

स्थावर: 1 लाख 05 हजार

शिवसेना उमेदवार – भावना गवळी

यांच्याकडे रोख 24 लाख 70 हजार 780 रक्कम आहे

हुंडाई क्रेटा, इन्होवा हुंडाई वेर्ना अशा तीन गाड्या आहेत

सोने 200 ग्रॅम तर चांदी 1200 ग्रॅम आहे

एकूण स्थूल मूल्य 1 कोटी 57 लाख 15 हजार 275 असे असून

स्थावर मालमत्ता 8 कोटी 11 लाख 57 हजार 914 एवढी आहे.

 

काँग्रेस – माणिकराव ठाकरे

वाहन : इनोव्हा ,क्रेटा

रोख रक्कम

स्वतः माणिकराव -16 लाख 59 हजार 799

पत्नी : 9 लाख 62 हजार 725

स्थावर मालमत्ता 1290750

जंगम मालमत्ता 9000000

पत्नी 7200000

 

परसराम आडे – अपक्ष उमेदवार

रोख 68029

पत्नी 5189772

वाहन : इनोव्हा ,सेलेरिओ

सोने 298 ग्रॅम

पत्नी 373 ग्रॅम

स्थूल मालमत्ता

स्वतः : 2982858

पत्नी 7025335

स्थावर मालमत्ता

177293576

संबंधित बातम्या

साहित्य संमेलनात भाषण गाजवणाऱ्या वैशाली येडे निवडणुकीच्या रिंगणात  

सणसणीत भाषणानंतर उद्धव ठाकरेंचा थेट फोन, वैशाली येडेंचे 5 प्रश्न