AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहित्य संमेलनात भाषण गाजवणाऱ्या वैशाली येडे निवडणुकीच्या रिंगणात

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सुद्धा उडी घेतली आहे. 92 व्या साहित्य संमेलनातून विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा सारस्वतांसमोर ठामपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांना प्रहार संघटनेने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वैशाली येडे या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. शेतकरी, शेतकरी विधवा महिला आणि कष्टकरी […]

साहित्य संमेलनात भाषण गाजवणाऱ्या वैशाली येडे निवडणुकीच्या रिंगणात
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सुद्धा उडी घेतली आहे. 92 व्या साहित्य संमेलनातून विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा सारस्वतांसमोर ठामपणे मांडणाऱ्या वैशाली येडे यांना प्रहार संघटनेने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वैशाली येडे या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. शेतकरी, शेतकरी विधवा महिला आणि कष्टकरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे वैशाली येडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांचे दुःख दिल्ली दरबारी मांडण्यासाठी माझी उमेदवारी असून, मला राजकारण करता येत नाही, असे वैशाली येडे म्हणाल्या. विशेष म्हणजे, दारुबंदीच्या मागणीसाठी दारुच्या दुकानासमोर दूध वाटप करुन, त्यानंतर रक्तदान करुन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही वैशाली येडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होणारा जिल्हा अशी दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात 92 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. या संमेलनाच्या नियोजित उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्याने, शेतकरी महिला वैशाली येडे यांनी संमेलनाच्या उद्घटान केले. शिवाय, सारस्वतांच्या व्यासपीठावरुन विधवा शेतकरी महिलांच्या व्यथा ठामपणे मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भाषणाची राज्यभर चर्चा झाली होती.

यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार भावना गवळी याच रिंगणात आहेत. त्यामुळे वैशाली येडे यांना या दोन दिग्गजांचा सामना करावा लागणार आहे.

VIDEO : वैशाली येडे यांचं साहित्य संमेलनात गाजलेलं भाषण  

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ