सणसणीत भाषणानंतर उद्धव ठाकरेंचा थेट फोन, वैशाली येडेंचे 5 प्रश्न

यवतमाळ: 92 व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी खणखणीत भाषण करणाऱ्या शेतकरी महिलेला थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मातोश्रीवरुन फोन करुन उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. “माझं विधवापण हा निसर्गाचा नाही तर व्यवस्थेचा बळी आहे”, अशा शब्दात वैशाली येडेंनी सरकारचा समाचार घेतला होता. सरळ, साधं, सोपं …

सणसणीत भाषणानंतर उद्धव ठाकरेंचा थेट फोन, वैशाली येडेंचे 5 प्रश्न

यवतमाळ: 92 व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी खणखणीत भाषण करणाऱ्या शेतकरी महिलेला थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मातोश्रीवरुन फोन करुन उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. “माझं विधवापण हा निसर्गाचा नाही तर व्यवस्थेचा बळी आहे”, अशा शब्दात वैशाली येडेंनी सरकारचा समाचार घेतला होता. सरळ, साधं, सोपं पण तितकंच कठोर भाषण करणाऱ्या वैशाली येडेंच्या भाषणाला दिग्गज साहित्यिकांनी दाद दिली. वैशाली येडेंच्या या भाषणाची सत्तेचे वाटेकरी असलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांनी दखल घेत, फोन करुन सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.

वैशाली येडेंचे खडे सवाल

दरम्यान, याबाबत वैशाली येडेंनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. आजवर कुणी फोन केला नाही, कधी बघितलं नाही, पण आज उद्धव ठाकरेंनी फोन केला. भाषणानंतर सगळ्यांना आठवण आली. कालच्या भाषणानंतर आज महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरेंसोबत बोलणं करून दिलं. आम्ही भावासारखे मदत लागली तर सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचं वैशाली येडेंनी सांगितलं. आजपर्यंत  मेली का आहेस म्हणून कोणी विचारलं नाही. पण काल या स्टेजवरवर चढली तर सेलिब्रिटी झाली. जो तो विचारतोय आता, असंही त्या म्हणाल्या.

वैशाली येडेंचा प्रश्न 1

उद्घाटनाला जे पाहुणे येणार होते (नयनतारा सहगल) ते आले नाहीत म्हणूनच मला संधी मिळाली नाहीतर माझ्यासारख्या बाईला कोण विचारतंय, असा सवाल वैशाली येडेंनी विचारला.

साहित्य संमेलन : उद्घाटक वैशाली येडे यांचं संपूर्ण भाषण

प्रश्न 2

आमच्यासारख्या महिलांची परिस्थिती लय वाईट आहे. कुणी चांगल्या नजरेनं बघत नाही, राहायला घर नाही, पोरांचं शिक्षण नाही, जगायचं तरी कसं?  अशी उद्विग्नता वैशालीताईंनी मांडली.

प्रश्न 3

घरकुल देतात तर कोणाला? मी मेल्यावर देणार का घर?  अशी प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

प्रश्न 4

शेतकऱ्याला चांगला भाव दिला तर कोण कशाला आत्महत्या करतंय? मला जे विधवापण आलंय ते केवळ सरकारमुळेच आलंय. योग्यवेळी मदत मिळाली असती तर आजते वाचले असते, असं वैशाली येडे म्हणाल्या.

माणूस मेला की सरकार म्हणतं एक लाख घे आणि मोकळा हो. माणूस मेला की लाखभर रूपये देतात आणि चालते हो म्हणतात.

पाऊस नाही सरकारला काही देणंघेणं नाही. त्यामुळे आत्महत्या होतात. सरकारने भाव दिला तर आत्महत्या थांबतील. त्यावेळी पिकाला भाव मिळाला असता  तर माझा नवरा गेला नसता, असं वैशाली येडे म्हणाल्या.

प्रश्न 5

एकवेळ मदत देतात आणि मग वाऱ्यावर सोडलं. अरे त्यापेक्षा हाताला काम द्या, रोजगार द्या, एवढ्यात आम्ही जगायचं कसं ?  असाही सवाल त्यांनी केला.

VIDEO:

 

संबंधित बातम्या

साहित्य संमेलन : उद्घाटक वैशाली येडे यांचं संपूर्ण भाषण 

पेच मिटला, साहित्य संमेलनाचं उद्घाटन शेतकरी महिला करणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *