आधी अमोल कोल्हे, नंतर पंकजा मुंडे आणि आता वंचितच्या प्रवक्त्याचा फेटा न बांधण्याचा निर्धार

| Updated on: Oct 14, 2019 | 4:56 PM

"बीडमध्ये क्षीरसागर यांना पराभूत केल्याशिवाय फेटा बांधणार नाही", असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला (Vanchit Shivraj Bangar) आहे.

आधी अमोल कोल्हे, नंतर पंकजा मुंडे आणि आता वंचितच्या प्रवक्त्याचा फेटा न बांधण्याचा निर्धार
Follow us on

बीड : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या विधानसभेतच्या प्रचारात नवा ट्रेंड (Vanchit Shivraj Bangar) आला आहे. तो म्हणजे फेटा न घालण्याचा. “बीडमध्ये क्षीरसागर यांना पराभूत केल्याशिवाय फेटा बांधणार नाही”, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला (Vanchit Shivraj Bangar) आहे. त्यांच्या या निर्णयामुळे फेट्याचा हा ट्रेंड सध्या बीड जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनला (Vanchit Shivraj Bangar) आहे.

“जोपर्यंत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर अशा दोन्ही उमेदवारांना पराभूत करणार नाही. तोपर्यंत मी कधीच आयुष्यात डोक्यावर फेटा बांधणार नाही.” असे शिवराज बांगर यावेळी म्हणाले. बांगर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान डोक्यावरील फेटाही काढला.

विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु होताच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. एकीकडे राजकीय पळवापळवी सुरु आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सर्व पक्षांनी यात्रांचा धडाका लावला आहे. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाची तारीख जवळ आल्याने प्रचारसभेत चांगलीच रंगत चढत चालली आहे. एरवी विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या आपल्याला ऐकायला मिळतात.

परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत आमचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही. जेव्हा आमदार होतील, त्यावेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe) यांनी केला.

त्यापाठोपाठ महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील भाजप उमेदवारांना विजयाचा गुलाल लावणार नाही. तो पर्यंत फेटा बांधणार नाही. असा निर्धार केला.