मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर; वरून सरदेसाईंचं सूचक वक्तव्य

अजय देशपांडे

|

Updated on: Sep 10, 2022 | 4:05 PM

मुंबई (Mumbai) महापालिकेसाठी शिवसेना काय रणनिती आखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. निवडणुकीबाबत वरून सरदेसाई यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेच्या 'या' नेत्यावर; वरून सरदेसाईंचं सूचक वक्तव्य
Image Credit source: Mumbai tak

सोलापूर : मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुंबई महापालिकेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. मात्र यंदा राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या पाहता यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी (Shiv sena) सोपी राहिलेली नाही. त्यामुळे मुंबई (Mumbai) महापालिकेसाठी शिवसेना काय रणनिती आखणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, असं सूचक वक्तव्य शिवसेना नेते वरून सरदेसाई यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरदेसाई?

आदित्य ठाकरे हे शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आहेत.  ते शिवसेनेचा चेहरा आहेत. आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री होते.  मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहराला अपेक्षीत जे विकास कामे आहेत ती आदित्य ठाकरे पालकमंत्री असताना झाली आहेत. मुंबईतील तरुण वर्ग हा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक जरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असली तरी देखील आदित्य ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी असेल असं वरून सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांना यावेळी  याकूब मेमन प्रकरणाबाबत विचारले असता त्यांनी बोलणे टाळले.  या संपूर्ण प्रकरणावर यापूर्वीच आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नसल्याचे सरदेसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुंबई उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

यावेळी बोलताना वरून सरदेसाई यांनी मनसे, शिंदे गट युतीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मागील तीस वर्षांमध्ये शिवसेनेने अशी भरपूर आव्हाने पेललेली आहेत.  आता सुद्धा जे आव्हान आहे त्याचा सामना करू.  3 पक्ष काय 30 पक्ष जरी एकत्र येऊद्यात, मुंबईकर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाम पाठिशी उभे असल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI