AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC election 2022 : बदललेल्या प्रभागरचनेत विजयाची पुनरावृत्ती करणार बहुजन विकास आघाडी? वाचा, प्रभाग 25ची स्थिती

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. याठिकाणी 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना झोपवले होते. इतर पक्षांमध्ये शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.

VVMC election 2022 : बदललेल्या प्रभागरचनेत विजयाची पुनरावृत्ती करणार बहुजन विकास आघाडी? वाचा, प्रभाग 25ची स्थिती
वसई विरार महापालिका, वॉर्ड 25Image Credit source: tv9
| Updated on: Aug 07, 2022 | 8:30 AM
Share

वसई विरार : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीच्या (VVMC election 2022) तयारीला राजकीय पक्ष लागले आहेत. मागील निवडणूक 2015ला झाली होती. आता येथील निवडणूक इतर महापालिकांच्या निवडणुकीसोबत होणार असल्याचे दिसत आहे. एकूण 115 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. 115 जागांपैकी तब्बल 106 जागी बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) विजय मिळवला होता. तर इतर जागांवर बाकीच्या पक्षांना विजय मिळवता आला. त्यावेळी एक प्रभाग एक नगरसेवक अशी रचना होती. यावेळी तीन सदस्यीय प्रभागरचना असणार आहे. त्यातही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र सध्यातरी तीन सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे प्रशासनाने तयारी केली आहे. यामुळे प्रभागांची रचना बदलली आहे. त्याचबरोबर आरक्षणही बदलले आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीसोबत इतर पक्ष कशापद्धतीने लढतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे. एकूण 42 वॉर्डातूनही (Ward) निवडणूक होईल.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 25ची राजीव गांधी शाळा परिसर, धानिव बाग, श्रीराम नगर, बिलाल पाडा, पांडेनगर, जीवननगर, सत्यनारायण मंदिर परिसर (गावराईपाडा), गावराईपाडा फेज 2 परिसर, डोंगरपाडा अशी व्याप्ती आहे. तर बारोंडा देवी मंदिर, महादेव मंदिर, खैरपाडा, पारले इंडस्ट्री, वरूण इंडस्ट्री, सतीश स्टील, तिरूपती बालाजी नगर, वालईपाडा आदी महत्त्वाचा परिसर आहे.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 25मधील एकूण लोकसंख्या 30,799 इतकी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1080 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1488 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता. याठिकाणी 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना झोपवले होते. इतर पक्षांमध्ये शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे विजयाची पुनरावृत्ती बहुजन विकास आघाडी करणार का, हे पाहावे लागणार आहे.

विजयी उमेदवार (2017)

प्रभाग 25मध्ये मागील वेळी बहुजन विकास आघाडीच्या मीनल रमाकांत पाटील यांनी विजय मिळवला होता. यावेळी आरक्षण आणि प्रभाग रचना बदलली असल्यामुळे प्रत्येकालाच आपला सोयीस्कर प्रभाग शोधावा लागणार आहे.

प्रभाग 25 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

प्रभाग 25 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

प्रभाग 25 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग 25मध्ये मागील वेळेप्रमाणे आरक्षण नसून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार 25 अ हा इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा विभाग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.