AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC election 2022 : पुन्हा विजय मिळवणार बहुजन विकास आघाडी? वाचा, वसई-विरार महापालिका प्रभाग 26मधली लढत कशी असेल…

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने याठिकाणी विजय मिळवला होता. चिरायू चौधरी यांनी बाजी मारली होती. यावेळी प्रभागरचना बददली आहे. त्यामुळे प्रभाग 26मध्ये कोण उमेदवार असेल आणि कोणत्या पक्षाचा विजय होईल, याची उत्कंठा असेल.

VVMC election 2022 : पुन्हा विजय मिळवणार बहुजन विकास आघाडी? वाचा, वसई-विरार महापालिका प्रभाग 26मधली लढत कशी असेल...
वसई विरार महापालिका, वॉर्ड 26Image Credit source: tv9
| Updated on: Aug 08, 2022 | 7:30 AM
Share

वसई विरार : राज्यात यंदा निवडणुकीची धामधूम आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचे दावे करीत आहेत. मात्र मतदारराजा त्यांना खरी जागा निवडणुकीत दाखवणार आहे. राज्यातील विविध महापालिकांप्रमाणेच वसई-विरार महानगरपालिकेचीदेखील यावर्षी निवडणूक (VVMC election 2022) होणार आहे. आधीची निवडणूक 2015ला झाली होती. त्यात बहुजन विकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली होती. 115 जागांपैकी तब्बल 106 जागा बहुजन विकास आघाडीने (Bahujan Vikas Aghadi) मिळवत महापालिकेत सत्ता काबीज केली होती. मागील वेळी प्रभागरचना, आरक्षण पूर्णत: वेगळे होते. तर यावेळी तीन सदस्यीय प्रभागरचना प्रस्तावित आहे. ती चार होणार की तीन राहणार हे स्पष्ट होणार आहे. 42 वॉर्डांतून ही (Ward) निवडणूक होणार आहे. प्रभाग 26मध्ये मागील वेळी बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला होता. ही परंपरा यावेळीही कायम राहणार असल्याचा विश्वास बविआला आहे.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 26ची वसई फाटा, वाकनपाडा, धनिव तलाव, रशिद कंपाऊंड, जाधवपाडा, अलहबीब कंपाऊंड, धुरी रिसॉर्ट, नवजीवन, फणसपाडा, शांतीनगर, वरूण इंडस्ट्रीज, गावदेवी मंदिर अशी व्याप्ती आहे. तर बारोंडा देवी मंदिर, महादेव मंदिर, नालासोपारा-पेल्हार मुख्य रस्ता, शालीमार हॉटेल, मदरसा दारूसलाम मस्जीद, सुन्नी मस्जीद, वालीव नाका, के. टी. इंडस्ट्रीयल पार्क, राजीव गांधी शाळा आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 26मधील एकूण लोकसंख्या 26,424 इतकी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 1725 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1841 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

2015च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने याठिकाणी विजय मिळवला होता. चिरायू चौधरी यांनी बाजी मारली होती. यावेळी प्रभागरचना बददली आहे. त्यामुळे प्रभाग 26मध्ये कोण उमेदवार असेल आणि कोणत्या पक्षाचा विजय होईल, याची उत्कंठा असेल. 115पैकी 106 जागा मिळवत इतर सर्वच पक्षांना बहुजन विकास आघाडीने पराभूत केले होते. यात शिवसेनेला 5, भाजपाला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली होती.

विजयी उमेदवार (2017)

चिरायू प्रणय चौधरी – बहुजन विकास आघाडी

प्रभाग 26 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

प्रभाग 26 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

प्रभाग 26 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग 26मध्ये यावेळी आरक्षण बदलले आहे. मागील वेळेप्रमाणे ते नसणार आहे. त्यानुसार 25 अ हा इतर मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा विभाग सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.