Vice Presidential Election : जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

Vice Presidential Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही नेत्यांचा राजकीय ग्राफ जवळजवळ सारखा आहे. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाल होत्या. दोघेही माजी मंत्री आहेत. दोघेही पेशाने वकील आहेत.

Vice Presidential Election : जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान
जगदीप धनखड की मार्गारेट अल्वा, उद्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:52 AM

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक (Vice Presidential Election) होत आहे. उद्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एनडीएकडून जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा (margaret alva) या उभ्या आहेत. या निवडणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर बहुजन समाज पार्टीने एनडीएला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली आहे. उद्याच उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. म्हणजे देशाला उद्याच नवा उपराष्ट्रपती मिळणार असल्याने जगदीप धनखड उपराष्ट्रपती होणार की मार्गारेट अल्वा याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उद्या 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यसभा आणि लोकसभा सदस्य मतदान करणार आहेत. यूपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी मलाच मतदान करण्याचं आवाहन खासदारांना केलं आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत पक्षाचा व्हीप नसणार आहे. भीती न बाळगता तुम्ही मतदान करा. उपराष्ट्रपती हा देशासाठी काम करणारा, निष्पक्ष असावा यासाठी मला मतदान करा, असं आवाहन मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

दोघेही माजी राज्यपाल

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या दोन्ही नेत्यांचा राजकीय ग्राफ जवळजवळ सारखा आहे. धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. तर अल्वा या गुजरातच्या राज्यपाल होत्या. दोघेही माजी मंत्री आहेत. दोघेही पेशाने वकील आहेत. त्यामुळे या दोन्ही तुल्यबळ नेत्यांपैकी कोण उपराष्ट्रपती होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

बसपा एनडीए सोबतच

मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही बसपाने एनडीएला पाठिंबा दिला होता.

शिवसेनेची पलटी

दरम्यान, शिवसेनेने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पलटी मारली आहे. शिवसेनेने या निवडणुकीत यूपीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने आधी यूपीएला पाठिंबा दिला होता. मात्र, खासदारांच्या दबावापोटी शिवसेनेने एनडीएला पाठिंबा दिला होता. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भूमिका बदलली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.