Video: आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात ‘लाव रे तो व्हिडीओ’! शिवसेनेनं दाखवलेले 4 व्हिडीओ तुम्हीही पाहा

राऊतांनी किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले!

Video: आता शिवसेनेची भाजपवर कुरघोडी, सोमय्या-मोदी-राणेंविरोधात 'लाव रे तो व्हिडीओ'! शिवसेनेनं दाखवलेले 4 व्हिडीओ तुम्हीही पाहा
विनायक राऊत पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:17 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधीकाळी मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. इतकंच नाही तर राऊतांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya), सुधीर मुनगंटीवार आणि मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. तर राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी थेट राणे पिता-पुत्रांचे आणि किरीट सोमय्यांचे काही व्हिडीओच दाखवले!

विनायक राऊत म्हणाले की, संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहे. बाळासाहेबांनीच त्यांना नेते केलं होतं. बाळासाहेबांनी राणेंना नेतेपद कधीही दिलं नाही. कारण हा माणूस सत्तापिपासू आहे हे त्यांना माहिती होतं. त्यातून राणेंची लायकी दिसून आली. संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, त्याचबरोबर ते आमचे नेते आहेत. ईडीद्वारे त्यांना त्रास दिला गेला. पण ते खऱ्या अर्थाने शिवसैनिक असल्यामुळे निधड्या छातीनं सेनाभवनात पत्रकार परिषद घेतली. त्याउलट राणेंच्या मागे जेव्हा ईडी लागली तेव्हा ते आणि त्यांचे चिरंजीव दिल्लीला गेले आणि चोर वाटेनं भाजप नेत्यांच्या समोर लोटांगण घातलं, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी राणेंवर केलीय. त्याचबरोबर ‘आज राणे यांना भाजप प्रेमाचा, मोदी प्रेमाचा कंठ फुटला आहे तो किती बेगडी आहे हे दिसून येतं. राणेंनी एक लक्षात घ्यावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना कोरोनाचा काळ असूनही सर्व देशवासियांनी आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाच मुख्यमंत्र्यांमध्ये दोन वेळा उद्धव ठाकरेंना नामांकन मिळालं आहे. त्यात भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही’, असंही राऊत म्हणाले.

सोमय्यांचा नेमका कोणता व्हिडीओ शिवसेनेनं दाखवला?

राणेंबाबत आज दुसऱ्या चरणात भांडाफोड करणार आहोत असं सांगत विनायक राऊत यांनी सोमय्या यांची एक व्हिडीओ क्लिप दाखवली. किरीट सोमय्या यांनी राणेंविरोधात आरोपांची एक मालिका चालवली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की राणेंच्या पत्नीच्या नावे कणकवलीतील निलम हॉटेलमधील गैरव्यवहार, मायनिंगबाबत अनेक आरोप केले होते. तसंच राणेंनी 100 बोगस कंपन्या निर्माण केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता, असं राऊत यावेळी म्हणाले.

नारायण राणेंनी मोदींवर केलेल्या टीकेचा व्हिडीओ

नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा प्रचार करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यात ‘खोटा बोला पण रेटून बोला त्याचं नाव नरेंद्र मोदी’ असं राणे म्हणाले होते.

नितेश राणेंनी सोमय्यांवर केलेल्या आरोपांचीही क्लिप दाखवली

संजय राऊत यांनी सातत्याने किरीट सोमय्या यांच्यावर मराठी भाषेसंदर्भात एक आरोप केला आहे. सोमय्या हे मराठी शाळेतून मराठी भाषा काढून टाका या मागणीसाठी कोर्टात केले होते, असा हा आरोप आहे. यापूर्वी नितेश राणे यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हाच आरोप केला होता. त्याचीही एक व्हिडीओ क्लिप आज शिवसेनेकडून दाखवण्यात आली.

राजन तेली यांच्या मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा व्हिडीओही दाखवला

भाजपचे सिंघुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश तेली हे एकदा कोकण रेल्वेनं कणकवलीकडे चालले होते. दादर रेल्वे स्थानकावर काही गुंडांनी भरधाव चाललेल्या कोकण रेल्वेखाली राजन तेली यांच्या मुलाला कसं ढकललं. त्यावेळी राजन तेली यांनी कुणावर आरोप केले होते? ते एकदा जरा ऐका असं म्हणत शिवसेनेनं त्याबाबतचीही एक क्लिप आपल्या पत्रकार परिषदेत दाखवली.

इतर बातम्या :

Narayan Rane vs Shivsena : ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो ‘बॉय’चं काम करायचा, राणेंनी ‘मातोश्री’तला तो प्रसंग सांगितला

Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.