तर तुम्हाला बघून घेतो… विक्रम काकडेंचा थेट इशारा, उमेश पाटलांवर हल्लाबोल; राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर!

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात आमदार विक्रम काकडे यांनी पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जाहीरपणे टीका केली.

तर तुम्हाला बघून घेतो... विक्रम काकडेंचा थेट इशारा, उमेश पाटलांवर हल्लाबोल; राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर!
Vikram Kakade vs Umesh Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 8:50 PM

अक्षय मंकणी/रंजीत जाधव, टीव्ही9 मराठी : आमदार विक्रम काकडे यांच्याकडून पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यावर जाहीर भाषणातून टीका करण्यात आली आहे. उमेश पाटील यांच्याकडून आमदार विक्रम काकडे पैशांच्या जीवावर आमदार झाल्याची चर्चा होतं असल्याचा काकडे यांचा आरोप आहे. पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदार होणारा अद्याप जन्माला आलेला नाही असल्याचा काकडेंकडून भाषणा दरम्यान उल्लेख झाला आहे. या सगळ्या टीकेच्या अनुषंगाने उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला असून हा सगळा विषय पक्षांतर्गत असून आपण याबाबत वरिष्ठांशी बोलू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

असत्यही सत्य वाटतं

पैसे घेऊन आमदार झाल्याची चर्चा सतत झाल्यास असत्य देखील सत्य वाटतं, असं म्हणत अशी चर्चा बंद करण्याचा विक्रम काकडेंनी उमेश पाटलांना इशारा दिला आहे. मावळ येथे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने आयोजित पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात विक्रम काकडे यांच्याकडून उमेश पाटलांवर भाषणा दरम्यान टीका करण्यात आली आहे. आपल्याबाबतची अशी चर्चा न थांबल्यास बघून घेण्याचा विक्रम काकडे यांनी इशारा दिला आहे.

Loading...

मावळच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विक्रम काकडेंचा पक्षांतर्गत विरोधकांना इशारा

‘पवार कुटुंबाला विकत घेऊन आमदारकी घेणारा महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही’. पक्षातीलच काही नेत्यांवर काकडेंचा थेट निशाणा
‘माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. राष्ट्रवादी नेते उमेश पाटील यांना काकडेंचा इशारा. उमेश पाटलांना जास्त महत्त्व देणं मला पटत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं मी माझं करतो, अशी टीका करण्यात आली आहे.

विद्यार्थी आंदोलनावरही काकडेंचं वक्तव्य

दरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या ९९ टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा. आता केवळ १-२ मागण्या प्रलंबित. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करत असल्याचं काकडे म्हणाले. उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्री स्वतः निर्णय घेणार असल्याचं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्रव्यवहारातून लवकरच मार्ग निघण्याचा दावा त्यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us